'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 06:40 IST2026-01-11T06:40:56+5:302026-01-11T06:40:56+5:30
ही लढाई माझ्या नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे

'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
छत्रपती संभाजीनगर: मोठ्या हिम्मतीने या शहराचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव केले. नंतर सत्तेत आलेले त्याला छत्रपती लावून आम्हीच नामकरण केले, असे सांगत आहेत. खरंच तुमच्यात हिम्मत असेल तर अमित शाह ज्या शहराचे प्रतिनिधीत्व करतात, त्या अहमदाबादचे नामकरण कर्णावतीनगर करून दाखवा, असे आव्हान उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर सभेत दिले.
महापालिका निवडणूक प्रचारार्थ ठाकरे यांची जाहीर सभा शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली. यावेळी पक्षाचा वचननामा प्रकाशित करण्यात आला.
गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला. याचे शल्य आहे. तुमचे जर शिवसेनेवर प्रेम नसते तर आज हे मैदान भरले नसते. एवढी गर्दी जमल्यावरही ते पैशाच्या मस्तीवर निवडणूक फिरवायला निघाले आहेत. ही लढाई माझ्या अस्तित्वाची नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे -उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेना