शेवटचा दिवस बंडखोरीचा; शिवसेना, भाजप, एमआयएमच्या उमेदवारांची वाढणार डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 18:21 IST2019-10-04T17:21:16+5:302019-10-04T18:21:28+5:30

शहरातील तिन्ही मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर बंडखोरी

Maharashtra Election 2019 : The last day of the rebellion; Massive uprising in all three constituencies in the city | शेवटचा दिवस बंडखोरीचा; शिवसेना, भाजप, एमआयएमच्या उमेदवारांची वाढणार डोकेदुखी

शेवटचा दिवस बंडखोरीचा; शिवसेना, भाजप, एमआयएमच्या उमेदवारांची वाढणार डोकेदुखी

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य या तिन्ही मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी अर्ज दाखल केले. यामुळे भाजप शिवसेना आणि एमआयएमच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

विधानसभेसाठी तिकीट वाटपात सर्वच राजकीय पक्षात असंतोष पाहायला मिळत आहे. यातच मुख्य राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी गुरुवारीच अर्ज दाखल केल्याने अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसाकडे राजकीय धुरिणांचे लक्ष होते. औरंगाबाद पूर्वमधून भाजपकडून अतुल सावे, औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाट आणि औरंगाबाद मध्यमधून एमआयएमच्या अधिकृत उमेद्वारांविरोधात बंडखोरी पाहायला मिळाली. 

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमच्या विरोधात जावेद कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या विरोधात सेनेचे राजू वैद्य यांनी अर्ज दाखल केला. पश्चिम विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट यांच्याविरोधात भाजपचे राजू शिंदे यांनी अर्ज भरला. पूर्व विधानसभा मतदारसंघात एमआयएमच्या विरोधात काँग्रेसचे माजी नगरसेवक इब्राहिम भैया पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे. ही बंडखोरी कायम राहिली तर बहुरंगी लढती होऊन वेगळाच निकाल लागू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : The last day of the rebellion; Massive uprising in all three constituencies in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.