छत्रपती संभाजीनगर मनपात शिंदेसेनेने ११ ठिकाणी भाजपला, तर २ ठिकाणी उद्धवसेनेला पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:05 IST2026-01-19T16:04:28+5:302026-01-19T16:05:45+5:30

महापालिका निवडणुकीत स्वकियांशीच झाला शिंदेसेनेचा सामना

In Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation, Shinde Sena defeated BJP in 11 seats and Uddhav Sena in 2 seats | छत्रपती संभाजीनगर मनपात शिंदेसेनेने ११ ठिकाणी भाजपला, तर २ ठिकाणी उद्धवसेनेला पाडले

छत्रपती संभाजीनगर मनपात शिंदेसेनेने ११ ठिकाणी भाजपला, तर २ ठिकाणी उद्धवसेनेला पाडले

छत्रपती संभाजीनगर : भाजप आणि शिंदेसेनेचे नेते आमची लढाई एमआयएमसोबत असेल, असे जाहीरपणे सांगत होते. प्रत्यक्षात मात्र शिंदेसेनेने जिंकलेल्या १३ जागांपैकी ११ ठिकाणी भाजपसोबत, तर दोन प्रभागात उद्धवसेनेसोबत अटीतटीचा सामना करीत यश मिळविल्याचे दिसून आले.

महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान केलेले दावे - प्रतिदावे किती फोल होते हे आता समोर आले आहे. शिंदसेेनेने मनपा निवडणुकीसाठी तब्बल ९५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. यापैकी केवळ १३ ठिकाणी त्यांना विजय मिळाला. शिंदेसेनेने जिंकलेल्या एकूण जागांपैकी ११ ठिकाणच्या उमेदवारांचा थेट सामना भारतीय जनता पक्षाशी झाला. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या उमेदवारांवर मात करून हे उमेदवार विजयी झाले आहेत. दोन ठिकाणी तर शिंदेसेनेची लढाई थेट पूर्वाश्रमीच्या त्यांच्याच पक्षाच्या अर्थात उद्धवसेनेच्या उमेदवारांसोबत झाली.

उद्धवसेनेने चार ठिकाणी पाडले भाजप आणि शिंदेसेेनेला
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेला अत्यल्प सहा जागा मिळाल्या आहेत. हे यश मिळविताना उद्धवसेनेच्या उमेदवारांनी दोन ठिकाणी पूर्वाश्रमीचा सहकारी असलेल्या भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला, तर शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या स्वकीय शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना धूळ चारली आहे. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा पराभव करीत यश मिळवले. महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेने तब्बल ९९ उमेदवार उभे केले होते.

Web Title : शिंदे सेना ने औरंगाबाद महानगरपालिका में बीजेपी को 11 सीटों पर हराया

Web Summary : औरंगाबाद में शिंदे सेना ने 13 सीटें जीतीं, जिसमें बीजेपी को 11 और उद्धव सेना को 2 सीटों पर हराया। उद्धव सेना ने छह सीटें हासिल कीं, बीजेपी और शिंदे सेना को दो-दो स्थानों पर पराजित किया। चुनाव परिणामों के बाद राजनीतिक दावे खोखले साबित हुए।

Web Title : Shinde's Sena Defeats BJP in 11 Aurangabad Municipal Corporation Seats

Web Summary : In Aurangabad, Shinde's Sena won 13 seats, defeating BJP in 11 and Uddhav Sena in 2. Uddhav Sena secured six seats, overcoming BJP and Shinde Sena in two places each. Political claims proved hollow post-election results.