औरंगाबाद पूर्व मतदारसंघात महायुती, एमआयएम अन् वंचितमध्येच मुख्य लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 20:24 IST2024-11-05T20:23:03+5:302024-11-05T20:24:14+5:30
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात पाच तासांत ४० उमेदवारांची माघार, तरीही २९ उमेदवार मैदानात

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात महायुती, एमआयएम अन् वंचितमध्येच मुख्य लढत
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ४० उमेदवारांनी माघार घेतली. आता २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
२९ ऑक्टोबरपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत ७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती ६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यातील ४० उमेदवारांनी ४ नाेव्हेंबर रोजी माघार घेतली. २९ उमेदवार मतदारसंघातून लढणार आहेत. प्रमुख लढत महायुती, महाविकास आघाडी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बसपा, समाजवादी पक्ष व अपक्ष उमेदवारांमध्ये होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फक्त पाच तासांचा अवधी होता. त्यामुळे अनेक उमेदवारांना धावपळ करावी लागली.
पूर्व मतदारसंघ: निवडणूक मैदानातील उमेदवार
अतुल सावे : भाजप
लहूजी शेवाळे : काँग्रेस
शीतल बनसोडे : बसपा
अफसर खान : वंचित बहुजन आघाडी
डॉ.गफ्फार कादरी : समाजवादी पार्टी
इम्तियाज जलील : एमआयएम
इसा यासीन : एआयएमएआयएएम
जयप्रकार घोरपडे : पीडब्ल्यूपीआय
योगेश सुरडकर : लोकराज्य पार्टी
रवीकिरण पगारे : व्हीसीके
राहुल साबळे : एएसपी (कांशीराम)
साहेबखान यासीनखान : बीआरएसपी
शकिला नाजेखान पठाण : अपक्ष
तसनीम बानो : अपक्ष
दैवशाली झिने : अपक्ष
नीता भालेराव : अपक्ष
पाशू शेख : अपक्ष
मधुकर त्रिभुवन : अपक्ष
मोहम्मद मोहसीन : अपक्ष
राहूल निकम : अपक्ष
लतीफखान : अपक्ष
शहजादखान : अपक्ष
शमीम शेख : अपक्ष
शेख अहमद : अपक्ष
सद्दाम अब्दुल अ.शेख : अपक्ष
सलीम उस्मान पटेल : अपक्ष
सोमनाथ वीर : अपक्ष
संतोष साळवे : अपक्ष
हनीफ शाह : अपक्ष