नकोशी समजून टाकून दिलेले बाळ ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 14:49 IST2020-10-04T14:49:02+5:302020-10-04T14:49:41+5:30

औरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि मुलगी समजून आईने शेतात फेकलेल्या टणकी येथील बाळावर घाटीत उपचार सुरू आहेत. केवळ १२०० ग्रॅम वजनाच्या या बाळाची प्रकृती गंभीर असून जगण्यासाठी त्याच संघर्ष सुरू आहे. पाच मुलींनंतर सहाव्यांदा परत मुलगीच झाली, असे समजून सुनीता साळुंके या मातेनेच नवजात बाळाला दि. ३० रोजी शेतात फेकून दिले होते.  मात्र  पुरूष जातीचे अर्भक सापडल्याची चर्चा गावात सुरू झाल्यानंतर हे बाळ माझेच असल्याचे मातेने सांगितले. या बाळावर बुधवारपासून घाटीतील बालरोग विभागाच्या वार्ड क्रं. २५ येथे उपचार सुरू आहेत. बाळाला जंतुसंसर्ग झाला असून त्याला वॉर्मरमध्ये ठेवण्यात आले आहे. बालरोग विभागप्रमुख डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. शिल्पा पवार, डॉ. अमृता मदने, डॉ. अभिषेक जैन, डॉ. उबेदऊर रहेमान  ...

The discarded baby is on oxygen | नकोशी समजून टाकून दिलेले बाळ ऑक्सिजनवर

नकोशी समजून टाकून दिलेले बाळ ऑक्सिजनवर

औरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि मुलगी समजून आईने शेतात फेकलेल्या टणकी येथील बाळावर घाटीत उपचार सुरू आहेत. केवळ १२०० ग्रॅम वजनाच्या या बाळाची प्रकृती गंभीर असून जगण्यासाठी त्याच संघर्ष सुरू आहे.

पाच मुलींनंतर सहाव्यांदा परत मुलगीच झाली, असे समजून सुनीता साळुंके या मातेनेच नवजात बाळाला दि. ३० रोजी शेतात फेकून दिले होते.  मात्र  पुरूष जातीचे अर्भक सापडल्याची चर्चा गावात सुरू झाल्यानंतर हे बाळ माझेच असल्याचे मातेने सांगितले.

या बाळावर बुधवारपासून घाटीतील बालरोग विभागाच्या वार्ड क्रं. २५ येथे उपचार सुरू आहेत. बाळाला जंतुसंसर्ग झाला असून त्याला वॉर्मरमध्ये ठेवण्यात आले आहे. बालरोग विभागप्रमुख डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. शिल्पा पवार, डॉ. अमृता मदने, डॉ. अभिषेक जैन, डॉ. उबेदऊर रहेमान  आणि  परिचारिका  बाळाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

याविषयी सांगताना बाळाचे वडील अशोक साळुंके म्हणाले की, दि. ३० सप्टेंबररोजी सुनीता यांना पोटात दुखत असल्याने  त्या शेतात शौचास गेल्या.  त्याचठिकाणी त्यांची प्रसूती झाली. पण भेदरलेल्या अवस्थेत त्या बाळाला तिथेच टाकून आल्या आणि चक्कर येत होती म्हणून  घरी येऊन  झोपल्या.  गावात चर्चा सुरू झाली असता, तिने हे सत्य सांगितले. हे अर्भक आमचेच असून आम्ही कोणत्याही  चौकशीस तसेच चाचणीस  तयार आहोत,  असेही  अशोक यांनी सांगितले. 

 

Web Title: The discarded baby is on oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.