भाजपाचे समीर राजूरकर बनले छत्रपती संभाजीनगरचे २३वे महापौर; एमआयएमच्या उमेदवाराला किती मते मिळाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:43 IST2026-02-10T14:34:09+5:302026-02-10T14:43:21+5:30
Chhatrapati Shambahjinagar Municipal mayor: छत्रपती संभाजीनगर महापालिका महापौर पदाची निवडणूक पार पडली. यात भाजपाचे उमेदवार समीर राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

भाजपाचे समीर राजूरकर बनले छत्रपती संभाजीनगरचे २३वे महापौर; एमआयएमच्या उमेदवाराला किती मते मिळाली?
छत्रपती संभाजीनगर: दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला नवीन महापौर मिळाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे समीर सुभाष राजूरकर यांची शहराचे २३ वे महापौर म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही घोषणा केली.
निवडणुकीचे गणित
समीर सुभाष राजूरकर (भाजप): ७० मते
अशोक रंगनाथ हिवराळे ( एम आय एम ): ३३ मते
उद्धवसेनेच्या नगरसेवकांसह १२ जण तटस्थ
या निवडणूक प्रक्रियेत एकूण १०३ मतदान झाले. विशेष म्हणजे १२ नगरसेवक तटस्थ राहिले, ज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ६, वंचित बहुजन आघाडीचे ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १ सदस्याचा समावेश आहे. तसेच काँग्रेसच्या नगरसेविका मलिका हबीब कुरेशी या मतदानावेळी गैरहजर होत्या.
शिंदेसेनेचा उपमहापौर
भाजपाने उपमहापौर पद शिंदेसेनेला दिले. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात एमआयएमचे महमद वसीम हे रिंगणात होते. राजेंद्र जंजाळ यांना ७० मते मिळाली, तर वसीम यांना ३३ मते मिळाली.