भाजपमध्ये 'स्वीकृत'ची लॉटरी कोणाला लागणार? १५० इच्छुकांनी बायो डेटा आले, चुरस वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:17 IST2026-02-14T13:16:19+5:302026-02-14T13:17:41+5:30

५७ जागांच्या विजयानंतर आता स्वीकृत सदस्यपदासाठी मोठी फिल्डिंग; १५० इच्छुकांमध्ये कोणाची लागणार वर्णी?

BJP Faces Tough Choice for Nominated Members in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation; 150 Applicants for 5 Seats | भाजपमध्ये 'स्वीकृत'ची लॉटरी कोणाला लागणार? १५० इच्छुकांनी बायो डेटा आले, चुरस वाढली!

भाजपमध्ये 'स्वीकृत'ची लॉटरी कोणाला लागणार? १५० इच्छुकांनी बायो डेटा आले, चुरस वाढली!

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत भाजपच्या सर्वाधिक ५७ जागा निवडून आल्या आहेत. भाजपला ५ जणांना स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत बसविता येईल. त्यासाठी पक्षानेच इच्छुकांचे बायो डेटा संकलन मोहीम सुरू केली आहे. पालिका निवडणुकीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशा ७६ जणांना पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याचा शब्द दिला आहे. त्या सर्वांसह पक्षातील विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून बायो डेटा मागविण्यात येत आहेत.

आजपर्यंत १५० जणांचे बायो डेटा पक्षाकडे आले आहेत. एका जागेसाठी ३० जणांत स्पर्धा असून संधी मिळण्यासाठी इच्छुक नेत्यांकडे हेलपाटे मारत असून आलेल्या बायो डेटांतून ५ जणांना संधी मिळेल, उर्वरितांची नाराजी पुन्हा पक्षाला सहन करावी लागणे शक्य आहे.

स्वीकृत सदस्य होण्यासाठी काही नियम आहेत, त्या नियमात बसणाऱ्या व्यक्तीस सदस्य होता येते. स्वयंसेवी संस्थेचे सदस्य असण्याची अट पूर्ण करण्यासाठी धर्मादाय कार्यालयात ‘चेंज रिपोर्ट’ देणाऱ्यांची सध्या गर्दी दिसते आहे. विविध ट्रस्टवर सदस्य असून अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचे पत्र अनेकांनी बायो डेटासोबत जोडले आहे.

दरम्यान भाजपला ५, एआयएमआयएमला ३, शिंदेसेनेला १ जागा संख्या बळाच्या आधारे मिळेल. उर्वरित एका जागेसाठी इतर पक्षांंचे एकत्रीकरण झाले तर एक जणाची वर्णी स्वीकृत सदस्य पदावर लागणे शक्य आहे. स्थायी समिती सदस्य, सभापती पदाच्या निवडीनंतर स्वीकृत सदस्य निवडीसाठी मनपातील पक्ष पदाधिकाऱ्याकडून प्रशासनाला पत्र दिले जाईल. मार्च महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरून सर्व इच्छुकांची नावे वरिष्ठांकडे पाठविली जातील. त्यानंतर विशेष समिती बायो डेटांची छाननी करील. समितीकडून नावे अंतिम होतील, असे भाजप सूत्रांनी सांगितले.

Web Title : भाजपा में 'मनोनीत' पार्षद की लॉटरी: 150 उम्मीदवार, सीमित सीटें!

Web Summary : छत्रपति संभाजीनगर भाजपा में मनोनीत पार्षद पदों के लिए कड़ी प्रतिस्पर्धा है। केवल पांच स्थानों के लिए 150 आवेदन प्राप्त होने से कई लोगों को निराशा का सामना करना पड़ेगा। पात्रता मानदंड, विशेष रूप से एनजीओ की भागीदारी को पूरा करना महत्वपूर्ण है। विशेष समिति द्वारा जांच के बाद मार्च में अंतिम चयन होने की उम्मीद है।

Web Title : BJP's 'Nominated' Councillor Lottery: 150 Hopefuls Vie for Limited Seats.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar BJP faces intense competition for nominated councillor positions. With 150 applications received for only five spots, many face disappointment. Fulfilling eligibility criteria, especially regarding NGO involvement, is crucial. Final selections are expected in March after scrutiny by a special committee.