Imtiaz Jaleel Attack: एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:02 IST2026-01-07T14:58:45+5:302026-01-07T15:02:15+5:30

MIM Imtiaz Jaleel Car Attack: पोलिसांनी सध्या बायजीपूरा भागात कडक बंदोबस्त तैनात केला असून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

Big ruckus at Imtiaz Jaleel's rally in Chhatrapati Sambhaji Nagar! Angry workers try to attack the vehicle | Imtiaz Jaleel Attack: एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले

Imtiaz Jaleel Attack: एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचार रॅलीवर बायजीपूरा भागात एका गटाने चाल करून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत एक कार्यकर्ता जखमी झाला असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला.

नेमकी घटना काय? 

इम्तियाज जलील यांची प्रचार रॅली बायजीपूरा परिसरातून जात असताना सुरुवातीला काही तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी माजी खासदार जलील यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रॅली पुढे गेली, पण रॅली संपताच अचानक काही तरुण जलील यांच्या गाडीच्या दिशेने चाल करून आले. यावेळी दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. जलील यांनी हा हल्ला कॉँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी केल्याचा आरोप केला.

शिरसाट, सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला 
हा हल्ला शिरसाट, सावे यांच्या गुंडांनी केल्याचा मोठा आरोप माजी खासदार जलील यांनी केला आहे. ते म्हणाले, ''आमच्यावर एका घोळक्याने हल्ला केला. त्यांना वाटले रॅली रद्द होईल. पण आम्ही गप्प बसणारे नाहीत. त्यांना घाबरून आम्ही शांत बसणार नाही. राजकारणात अशा घटना होत असतात. जे नाराज होते ते आज सभेत दिसतील. पोलिसांनी कारवाई करावी म्हणून सीसीटीव्ही फुटेज आम्ही दिले आहे. पोलिसांनी त्यांचे काम करावे.''

स्वतःच हल्ला करून घेतला, कलीम कुरेशी आक्रमक 
या हल्ल्याच्या घटनेवर काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी खळबळजनक दावा केला आहे. "जलील यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. हा हल्ला त्यांच्याच माणसांनी केला असून सहानुभूती मिळवण्यासाठी जलील यांनी स्वतःवर हल्ला घडवून आणला आहे," असा आरोप कुरेशी यांनी केला. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रॅली अडविण्याचा प्रयत्न झाला
दरम्यान, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी या सर्व राड्यास कॉँग्रेस उमेदवार कुरेशी जबाबदार असल्याचा आरोप केला. अशा हल्ल्याची पूर्वकल्पना आम्हाला होती. आम्ही रॅली अडविण्यात आली. माजी खासदार जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, पोलिसांनी माहिती देऊनही त्यांनी योग्य बंदोबस्त ठेवला नाही, असा दावाही एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी सध्या बायाजीपूरा भागात कडक बंदोबस्त तैनात केला असून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

Web Title : इम्तियाज जलील की रैली में हिंसा; गाड़ी पर हमले का आरोप।

Web Summary : संभाजीनगर में इम्तियाज जलील की रैली में झड़प हुई। प्रदर्शनकारियों ने काले झंडे दिखाए, जिससे हाथापाई हुई। जलील ने कांग्रेस पर आरोप लगाया; प्रतिद्वंद्वी ने इनकार किया, जलील पर सहानुभूति के लिए हमला करने का आरोप लगाया। पुलिस ने हस्तक्षेप किया, तनाव अधिक।

Web Title : Imtiaz Jaleel's rally turns violent; attack on vehicle alleged.

Web Summary : Clash erupted at Imtiaz Jaleel's rally in Sambhajinagar. Protesters showed black flags, leading to scuffles. Jaleel alleges Congress involvement; rival denies, accusing Jaleel of staging the attack for sympathy. Police intervened, tension high.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.