औरंगाबादमध्ये २३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:29 IST2019-04-09T13:28:21+5:302019-04-09T13:29:57+5:30
प्रत्येक मतदान केंद्रावर लागणार दोन ईव्हीएम

औरंगाबादमध्ये २३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात २३ उमेदवार असल्याचे सोमवारी दुपारनंतर स्पष्ट झाले. सायंकाळी ६ वा.निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी मतदारसंघातील ७ उमेदवारांनी माघार घेतल्याचे स्पष्ट करीत २३ जण मैदानात असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मतदारसंघातील २०१८ बुथवर प्रत्येकी दोन अशा ४ हजार ३६ ईव्हीएम मतदानासाठी लागणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत ६१३४ ईव्हीएम लागणार आहेत. अतिरिक्त ईव्हीएम मागविण्यात येणार आहेत.
निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार असे
प्रदीप दत्त, भगवान साळवे, रवींद्र बोडखे, आ.अब्दुल सत्तार, कल्याण पाटील, जियाउल्लाह अकबर शेख, साजीद बेगू पटेल या उमेदवारांनी आपली उमेदवारी शेवटच्या दिवशी मागे घेतली.
आ.सत्तार यांची माघार चर्चेत
कॉंग्रेसचे बंडखोर आ. अब्दुल सत्तार यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज सोमवारी दुपारी २ वा. मागे घेतला. अर्ज मागे घेताना त्यांनी काँग्रेसवर आगपाखड करीत आरोप केले, तर पाठिंबा किंवा कुणाचा प्रचार करणार याबाबत १५ एप्रिल रोजी भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आ. सत्तार हे निवडणूक मैदानात उतरल्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला होता.
मतदारसंघात रिंगणातील उमेदवार असे
उमेदवार पक्ष
खा.चंद्रकांत खैरे शिवसेना
आ.सुभाष झांबड काँग्रेस
आ. हर्षवर्धन जाधव अपक्ष
आ. इम्तियाज जलील एमआयएम
जया राजकुंडल बसपा
कुंजबिहारी अग्रवाल अपक्ष
अरविंद कांबळे बीआरएसपी
उत्तम राठोड आसरा लोकमंच पार्टी
दीपाली मिसाळ बहुजन मुक्ती पार्टी
नदीम राणा बहुजन महापार्टी
एम.बी.मगरे पीपीआय(डी)
महंमद जाकीर अ.कादर भारत प्रभात पार्टी
मोहसीन नसीमभाई नवभारत निर्माण पार्टी
सुभाष पाटील महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष
हबीब गयास शेख आंबेडकर नॅशनल काँग्रेस
कुरंगळ संजय अपक्ष
खान एजाज अहमद अपक्ष
जगन साळवे अपक्ष
सुरेश फुलारे अपक्ष
रवींद्र काळे अपक्ष
शेख खाजा किस्मतवाला अपक्ष
संगीता निर्मळ अपक्ष
मधुकर त्रिभुवन अपक्ष