सत्तार तुम्हाला गांधी दर्शन घडवतील, ते तुम्ही घ्या, पण मते मला द्या; बनकरांचा मतदारांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:46 IST2024-11-15T18:19:39+5:302024-11-15T18:46:46+5:30

कंकराळा येथील प्रचार सभेत ठाकरे सेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांचे आवाहन

Abdul Sattar will show you Gandhi's on Money, take it, but give me the votes; Thackeraysena candidate's Suresh Bankar's strange advice to voters  | सत्तार तुम्हाला गांधी दर्शन घडवतील, ते तुम्ही घ्या, पण मते मला द्या; बनकरांचा मतदारांना सल्ला

सत्तार तुम्हाला गांधी दर्शन घडवतील, ते तुम्ही घ्या, पण मते मला द्या; बनकरांचा मतदारांना सल्ला

सोयगाव : अब्दुल सत्तार यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये विकासाच्या नावाखाली केवळ सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून तुम्हाला गांधी दर्शन होईल. तुम्ही ते घ्या; पण मलाच मतदान करा, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी गुरुवारी कंकराळा येथील प्रचार सभेत केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी गुरुवारी गलवाडा, कंकराळा, माळेगाव, पिंपरी, तिखी, बहुलखेडा व निंबायती निंबायती तांडे आदी परिसरात पदयात्रा, गाठीभेटी व प्रचारसभा घेतल्या. यावेळी ते म्हणाले, अब्दुल सत्तार यांचा पराभव अटळ आहे, हे त्यानांही कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत माझ्याच नावाचा बोगस उमेदवार उभा केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे मलाच मोठा फायदा होऊन पंधरा हजार मतांचा लीड मिळेल, असेही ते म्हणाले. यावेळी अजित पाटील, पुष्पा काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवी काळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू काळे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मचे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Abdul Sattar will show you Gandhi's on Money, take it, but give me the votes; Thackeraysena candidate's Suresh Bankar's strange advice to voters