भरधाव टेम्पो उलटला; गाडीखाली दबून एक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:58 IST2025-02-16T17:58:08+5:302025-02-16T17:58:17+5:30
सिल्लोड भराडी रस्त्यावरील घटना

भरधाव टेम्पो उलटला; गाडीखाली दबून एक जागीच ठार
सिल्लोड: सिल्लोड भराडी रस्त्यावर बोरगाव जवळ असलेल्या सूतगिरणी जवळ भरधाव जाणाऱ्या टेम्पो चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला या अपघातात टेम्पो चालक स्वतःटेम्पो खाली दबून जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव शेखर रुस्तम सोनवणे (वय ३२ वर्ष रा. आमदाबाद ता. कन्नड) असे आहे.
सदर चालक टेम्पो मध्ये कापूस घेऊन सिल्लोड येथील जिनिंग मध्ये आला होता कापूस खाली करून तो परत गावाकडे जात असतांना समोरुन येणाऱ्या वाहनाने हुल दिल्याने चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले व टेम्पो रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला व त्या टेम्पो खालीच दाबून चालकाचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती सिल्लोड पोलिसांना देण्यात आली पोलीस नाईक विष्णु कोल्हे, विनोद सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन चालकाला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ राम मोहिते यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.शवंविच्छेदन करून त्याचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अपघात दाखल केला आहे.(फोटो)