वडेट्टीवार-धानोरकरांमध्ये लेखी सामंजस्य करार; महापौरपद धानोरकरांकडे तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:14 IST2026-02-07T15:11:19+5:302026-02-07T15:14:09+5:30

Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेवरून उफाळलेली गटबाजी स्वतः काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी (दि. ६) दुपारी नागपुरातील शंकरपेठ येथील विदर्भ को-ऑप. फेडरेशन येथे एकत्र येत संपुष्टात आणली.

Written MoU signed between Vadettiwar-Dhanorkar; Mayor post goes to Dhanorkar, Deputy Mayor post goes to Vadettiwar group | वडेट्टीवार-धानोरकरांमध्ये लेखी सामंजस्य करार; महापौरपद धानोरकरांकडे तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे

Written MoU signed between Vadettiwar-Dhanorkar; Mayor post goes to Dhanorkar, Deputy Mayor post goes to Vadettiwar group

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेवरून उफाळलेली गटबाजी स्वतः काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी (दि. ६) दुपारी नागपुरातील शंकरपेठ येथील विदर्भ को-ऑप. फेडरेशन येथे एकत्र येत संपुष्टात आणली. महापौरपद धानोरकरांकडे, उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे देण्याचा तोडगा निघाला आहे. राजेश अड्डूर यांना गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली. 

यानंतर नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात काँग्रेस २७ आणि बसपा १ असा २८ नगरसेवकांचा गट नोंदणी करण्यात आला आहे. स्थायी समिती सभापतिपद सत्ता स्थापनेसाठी सोबत येणाऱ्या मित्रपक्षाला देण्याचा निर्णय झाला. महापालिकेवर काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी ३४ हा बहुमताचा आकडा जुळविण्यासाठी दोन्ही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार पुढाकार घेतल्याचे समजते. अडीच वर्षासाठीचा हा नेत्यांमधील एकप्रकारचा लेखी सामंजस्य करार असल्याचे दोन्ही गटातील सूत्रांनी 'लोकमत'ला सांगितले.

दोन नेत्यांमधील करारात काय ?

हा करार अडीच वर्षांसाठीचा असून, यानुसार, महापौरपद धानोरकर आणि उपमहापौरपद वडेट्टीवार यांच्या मर्जीतील असेल. वडेट्टीवार गटाकडून सुरुवातीला सचिन कत्याल तर धानोरकर गटाकडून सुरेंद्र अडबाले यांचे नाव होते. दोन्ही नावांऐवजी राजेश अड्डूर हे नाव पक्षाकडून आले आणि त्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले. वास्तविक, राजेश अहूर हे सुरुवातीपासून वडेट्टीवार गटाकडे होते हे विशेष. स्थायी समितीची जबाबदारी धानोरकर गटाकडे असणार आहे.

आमच्यामध्ये गटबाजी नव्हती तर काही मुद्द्यावर एकमत होत नव्हते. अखेर यावर दोघांनी मिळून पुढील अडीच वर्षांसाठीच नव्हे तर पाच वर्षांसाठी चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता स्थापन व्हावी, या मुद्द्यावर एकमत झाले आहे. काय ठरले ही बाब लवकरच जनतेसमोर ठेवली जाणार आहे. दोन्ही नेते मिळून सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस विधिमंडळ नेते.
 

Web Title : वडेट्टीवार-धानोरकर समझौता: महापौर धानोरकर को, उपमहापौर वडेट्टीवार समूह को

Web Summary : विजय वडेट्टीवार और प्रतिभा धानोरकर ने चंद्रपुर कांग्रेस का झगड़ा खत्म किया। धानोरकर समूह को महापौर, वडेट्टीवार को उपमहापौर पद मिला। राजेश अड्डूर नए नेता हैं। समझौते का लक्ष्य पांच साल तक कांग्रेस का शासन है।

Web Title : Wadettiwar-Dhanorkar Agreement: Mayor to Dhanorkar, Deputy Mayor to Wadettiwar Group

Web Summary : Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar ended Chandrapur Congress infighting. Dhanorkar's group gets the Mayor post, Wadettiwar's the Deputy Mayor. Rajesh Addur is the new group leader. Agreement aims for Congress rule for five years.