९५ कोटींच्या कामांसाठी सहा वेळा निविदा मागवूनही कंत्राटदार का मिळेना ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:17 IST2025-07-01T17:16:17+5:302025-07-01T17:17:44+5:30

Chandrapur : राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या महामार्गाच्या आतापर्यंत सात निविदा प्रकाशित करण्यात आल्या

Why was no contractor found despite inviting tenders six times for works worth Rs 95 crore? | ९५ कोटींच्या कामांसाठी सहा वेळा निविदा मागवूनही कंत्राटदार का मिळेना ?

Why was no contractor found despite inviting tenders six times for works worth Rs 95 crore?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड :
एमआयडीसी व्हाया नागभीड ते भिकेश्वर या राष्ट्रीय महामार्गासाठी आतापर्यंत ६ वेळा निविदा मागविल्या गेल्या. मात्र प्रत्येकवेळी कंत्राटदार कंपन्यांनी या निविदेकडे पाठ फिरवली आहे. संबंधित विभागाने पुन्हा एकदा या कामासंदर्भात निविदा मागविली आहे. महामार्ग कामाची किंमत ९५ कोटी ४१ लाख ८५ हजार ६४३ रुपये आहे.


उमरेड- आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ डी हा दोनपदरी राष्ट्रीय महामार्ग आधीच मंजूर आहे. पहिल्या टप्प्यात आरमोरी ते नागभीड हा मार्ग पूर्ण करण्यात आला. या बाबीस सहा- सात वर्षांचा काळ लोटत असला तरी नागभीड ते उमरेड या मार्गाचे काम मात्र अद्यापही हाती घेण्यात आले नाही. रहदारीची वास्तविकता लक्षात घेता या मार्गाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नेहमीच केली जाते. पण घोडे कुठे अडले आहे, हे माहीत नाही. पण दरवर्षीच या कामास खो देण्यात येत आहे. परिणामी नागभीड ते कानपा मार्गावर अपघात घडतच आहेत.


पुन्हा मागविली निविदा

  • राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या महामार्गाच्या आतापर्यंत सहा निविदा प्रकाशित करण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, कंत्राटदार कंपन्यांनी याकडे पाठ फिरवली आहे.
  • आता सातव्यांदा राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुन्हा निविदा मागवली आहे. जेणेकरून कामाला सुरुवात होईल. आतातरी ९५ कोटी किंमत असलेल्या या मार्गाला कंत्राटदार पावतात का, याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


ऑक्टोबरपासून सुरुवात
ही निविदा प्रथम ११ ऑक्टोबर २०२४ मध्ये निघाली. एनएचएआयच्या वेबसाइटवर दर तीन महिन्यांनी पुढे ढकलली जातेय. सध्याची तारीख ऑगस्ट २०२५ मध्ये आहे.

Web Title: Why was no contractor found despite inviting tenders six times for works worth Rs 95 crore?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.