आश्रमशाळेतील शिक्षकांचे प्रश्न ताणले गेले, आता निर्णायक कृतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:11 IST2025-06-23T16:10:27+5:302025-06-23T16:11:03+5:30
Chandrapur : आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सभा

The issues of teachers in the ashram school have become tense, now decisive action is demanded
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत आदिवासी आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. सुधारित वेतन, जीपीएफ-एनपीएस पावत्यांची उपलब्धता, वेतन अदा यासारख्या मूलभूत समस्या अद्याप सुटल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात आमदार सुधाकर अडबाले यांनी समस्या निवारण सभा घेऊन समस्या तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत जीपीएफ/एनपीएस पावत्या वितरित कराव्यात. महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
आमदार अडबाले यांची अधिकाऱ्यांना फटकारणी
आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या 'समस्या तुमच्या, पुढाकार आमचा' या उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे समस्या निवारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अडबाले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले.
या आहेत समस्या...
- माध्यमिक शिक्षकांना मंजूर ४८०० ग्रेड पेप्रमाणे वेतन निश्चिती लागू नाही.
- प्राथमिक शिक्षकांसाठी ४३०० ग्रेड पेप्रमाणे वेतन निश्चिती अद्याप प्रलंबित.
- जीपीएफ व एनपीएस पावत्या २०२३-२४ व २०२४-२५ साठी दिल्या जात नाहीत.
- दरमहा १ तारखेला वेतन अदा न केल्यामुळे शिक्षक नाराज.
- प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर वेळेत निर्णय होत नाही.