Lok Sabha Election 2019; मतदार जागृतीसाठी आता स्वीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:42 AM2019-04-08T00:42:52+5:302019-04-08T00:43:54+5:30

जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग यांच्यामार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदान व्हावे. तसेच १८ वर्षांवरील सर्व महिला, युवक-युवती, वृध्द, अपंग यांनी मतदान करण्यासाठी येत्या ११ एप्रिलला बाहेर पडून मतदानांचा हक्क बजावून राष्ट्रीय महोत्सवात निर्भिडपणे सहभागी व्हावे यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे.

Lok Sabha Election 2019; Sweep now for voter awareness | Lok Sabha Election 2019; मतदार जागृतीसाठी आता स्वीप

Lok Sabha Election 2019; मतदार जागृतीसाठी आता स्वीप

googlenewsNext
ठळक मुद्देटक्केवारी वाढविणार : ८० हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग यांच्यामार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदान व्हावे. तसेच १८ वर्षांवरील सर्व महिला, युवक-युवती, वृध्द, अपंग यांनी मतदान करण्यासाठी येत्या ११ एप्रिलला बाहेर पडून मतदानांचा हक्क बजावून राष्ट्रीय महोत्सवात निर्भिडपणे सहभागी व्हावे यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम जिल्हा प्रशासन आणि जिल्हा निवडणूक विभाग राबवित आहे. आता मतदारांच्या जागृतीसाठी ‘स्वीप’ (सिस्टीमॅटीम वोटर्स एज्युकेशन अ‍ॅन्ड इलेक्टोरल पार्टीसीपेशन) उपक्रम सुरू केला आहे.
भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाची अंबलबजावणी जिल्हा प्रशासन आणि एम.सी.एम.सी च्या माध्यमातून करण्यात येत आहे. विविध मतदानासंबंधी जनजागृती विषयक कार्यक्रम ‘स्वीप’कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागात सुरु झालेले आहे. या संदर्भात माहिती ‘स्वीप’ चे नोडल अधिकारी दिपेंद्र लोखंडे यांनी दिली.
‘स्वीप’ कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात ८० हजारांपेक्षा जास्त मतदारांची नोंद झालेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी शंभर टक्के मतदानांचा हक्क बजावावा आणि मतदारांना मतदानासंबंधी जागृत करून मतदानासंबंधी शिक्षण देवून या देशाच्या राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हावे, या उद्देशाला अनुसरून ‘स्वीप’ कार्यक्रम राबविला जात आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळेमधील विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्याचा उपक्रम राबविलेला आहे. या अंतर्गत पालकांना निवडणुकीमध्ये मतदानांचा हक्क बजावण्याचा संकल्प या संकल्पपत्रामध्ये विद्यार्थ्यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ५० महाविद्यालयामध्ये मतदानासंबंधी विषयावर निबंध तसेच वकृत्व स्पर्धा घेण्यात आलेली आहे. वॉल पेंटींगच्या माध्यमातून मतदार जनजागृती करून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले जात आहे. याला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आहे.

२०७० केंद्रांवर मंचांची स्थापना
जिल्ह्यामध्ये २०७० मतदान केंद्रांवर मतदार जागृती मंचाची स्थापना करण्यात आली असून विविध केंद्र व राज्य शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, खाजगी संस्था व कार्यालय, स्वंयंसेवी संस्थांची कार्यालय, कारखाने इत्यादी अनेक ठिकाणी स्वीप अंतर्गत मतदार व मतदानाविषयी जनजागृती सुरू आहे.

आठ स्वयंसेवी संस्थेमार्फत पथनाट्ये
आठ स्वयंसेवी संस्थेमार्फत जिल्ह्यामध्ये पथनाट्यांद्वारे जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदानासाठी जनजागृती सुरु आहे. महिलांचा मतदानाचा टक्का वाढवा यासाठी मतदार जागृती कार्यशाळा घेण्यात आली. चंद्रपूर जिल्हयातील सर्व १८ वर्षावरील सर्व महिला, पुरुष, वृध्द, दिव्यांग, युवक-युवती यांनी येत्या ११ एप्रिलला मतदान करण्याचे आवाहनही याठिकाणी केले.

स्वीप अंतर्गत विविध उपक्रम
या उपक्रमामध्ये मतदार साक्षरता क्लब, मतदार जागृती मंच, चुनाव पाठशाला, संकल्प पत्र, पथनाट्ये, विविध माहिती फलके-पत्रके, आकाशवाणीमध्ये मतदार जागृतीसाठी आॅडीओ क्लिप ‘जिंगल्स’, चित्रपटगृहामध्ये मतदान जागृतीबाबत चित्रफिती दाखविणे, सायकल रिक्षा किंवा चित्ररथांच्या माध्यमातून मतदान जागृती, महिला, युवक, दिव्यांग व वृध्दांसाठी मतदान जागृती कार्यशाळा, इव्हीएम आणि व्ही.व्ही.पॅट विषयी माहिती देणे इत्यादी महत्वपूर्ण उपक्रम जिल्ह्यामध्ये राबविलेले आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Sweep now for voter awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.