विजयी नगरसेवकांवरून काँग्रेसमध्ये उफाळला वाद; धानोरकर व वडेट्टीवार गटातून एकमेकांवर तोफ डागणे सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:59 IST2026-01-22T19:47:34+5:302026-01-22T19:59:23+5:30

Chandrapur : महानगरपालिकेत काँग्रेस व मित्रपक्षाला ३० जागा मिळाल्यानंतर सत्तेची संधी निर्माण झाली. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रात इतरांनी लुडबुड करू नये, असे वक्तव्य माध्यमांसमोर केले होते.

Controversy erupts in Congress over winning corporators; Dhanorkar and Vadettiwar factions continue to fire cannons at each other | विजयी नगरसेवकांवरून काँग्रेसमध्ये उफाळला वाद; धानोरकर व वडेट्टीवार गटातून एकमेकांवर तोफ डागणे सुरूच

Controversy erupts in Congress over winning corporators; Dhanorkar and Vadettiwar factions continue to fire cannons at each other

लोकमत न्यूज नेटवर
चंद्रपूर :
महानगरपालिकेत काँग्रेस व मित्रपक्षाला ३० जागा मिळाल्यानंतर सत्तेची संधी निर्माण झाली. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रात इतरांनी लुडबुड करू नये, असे वक्तव्य माध्यमांसमोर केले होते. या वक्तव्याला काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आता या वादात एकमेकांचे समर्थकही उघडपणे उतरू लागले आहेत.

काँग्रेसच्या माजी शहर अध्यक्षांही टाकली उडी

काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष रामू तिवारी हे धानोरकरांचे समर्थक मानले जातात. महाकाली प्रभागातून त्यांचा पराभव झाला. मंगळवारी (दि. २१) त्यांनीही विरोधी पवित्रा घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर या मोठ्या नेत्या आहेत. त्यांनीही समजूतदारपणा दाखविला पाहिजे. काँग्रेसच्या १३ नगरसेवकांना यवतमाळ येथे ठेवण्यात आले. वन टू वन केल्यास सर्व नगरसेवक वडेट्टीवार यांच्यासोबत जाणार, अशी भूमिका माध्यमांसमोर मांडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

"आमदार विजय वडेट्टीवार हे मोठे आहेत. त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे. मात्र, त्यांच्याकडून माझ्याच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात ढवळाढवळ करण्याचे कारण काय, हे मला अद्याप समजले नाही. त्यांच्या समर्थकांकडून काही काँग्रेस नगरसेवकांना उचलण्याचा प्रकार घडविण्यात आला. काँग्रेस पक्षाचा गट तयार व्हायचा आहे. अजूनही वेळ गेली नाही. निवडून आलेले सर्व नगरसेवक पक्षासोबतच आहेत."
- प्रतिभा धानोरकर, खासदार

"नेते आणि खासदार दोघांचीही जबाबदारी सारखीच असते. संयम ठेवून काम करावे. प्रत्येक कार्यकर्त्याला मी आवडेलच असे नाही, वैचारिक मतभेद असू शकतात. बाळू धानोरकर यांना काँग्रेसमध्ये आणण्याची भूमिका माझीच होती. काही नगरसेवकांना जबरदस्तीने गाडीत बसवून घरी नेणे चुकीचे आहे. एकत्र बसून चंद्रपूरचा महापौर ठरवायचा आहे, निर्णय नगरसेवक घेतील, नेते नाहीत."
- विजय वडेट्टीवार, आमदार तथा विधिमंडळ नेते

Web Title : विजयी नगरसेवकों पर कांग्रेस में कलह; धानोरकर बनाम वडेट्टीवार गुट भिड़े।

Web Summary : चंद्रपुर में चुनाव के बाद कांग्रेस में आंतरिक कलह। धानोरकर और वडेट्टीवार गुट पार्षदों को लेकर भिड़े, हस्तक्षेप और जबरदस्ती के आरोप लगे। पूर्व शहर अध्यक्ष भी मैदान में उतरे।

Web Title : Congress infighting erupts over winning corporators; Dhanorkar vs. Wadettiwar factions clash.

Web Summary : Post-election, Congress faces internal conflict in Chandrapur. Dhanorkar and Wadettiwar factions clash over corporators, with accusations of interference and coercion. Former city president also joins fray.