तुम्ही आवडीने खाताय 'तो' च्यवनप्राश अस्सल की बनावट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:52 IST2025-03-03T16:50:23+5:302025-03-03T16:52:25+5:30

Chandrapur : च्यवनप्राशमध्ये असावे ५२ औषधी वनस्पतींचे मिश्रण

Chyawanprash that you are eating is genuine or fake? | तुम्ही आवडीने खाताय 'तो' च्यवनप्राश अस्सल की बनावट?

Chyawanprash that you are eating is genuine or fake?

परिमल डोहणे 
चंद्रपूर :
रोगी राहण्यासाठी बरेचदा आयुर्वेदिक तरल च्यवनप्राश खाण्याचा सल्ला देतात. च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. आजारांशी दोन हात करायला ताकद मिळते. यासह दिवसभर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. मात्र आजकाल अधिक नफा कमवण्याच्या नादात भेसळयुक्त च्यवनप्राश बाजारात विक्रीस आहेत. असे च्यवनप्राश खाल्ल्यास आरोग्याला कोणताच फायदा होत नाही. त्यामुळे अस्सल च्यवनप्राश सकाळी वा साध्यवेळेला खाण्यास पसंती द्यावी, असा सल्ला आयुर्वेदाचार्य डॉ. माधुरी धानोरकर यांनी दिला आहे.


असे ओळखा अस्सल च्यवनप्राश
च्यवनप्राश अस्सल आहे की नकली हे ओळखण्यासाठी त्याची चव चाखा. जर च्यवनप्राश साखरेसारखा चवीला गोड लागत असेल, तर त्यात साखर मिसळली असावी. त्यामुळे च्यवनप्राश खरेदी करताना त्याची चव चाखूनच खरेदी करावी. च्यवनप्राश हा देशी तूप आणि गुळापासून बनवला जातो. देशी तूप आणि गुळ हे दुधात अथवा पाण्यात विरघळत नाही ते दुधावर तरंगतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरातील च्यवनप्राश पाण्यात किंवा दुधात विरघळला तर तो बनावट आहे.


फायबर, प्रोटीन अन् व्हिटॅमिनचा भरणा
च्यवनप्राशमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बहुगुणी आवळा. आवळा व्हिटॅमिन सीचे भांडार आहे. तसेच अँटीऑक्सिडंट आहे. प्रोटीन, फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आदींनी परिपूर्ण असतो.


च्यवनप्राशमध्ये ५२ औषधी वनस्पतींचे मिश्रण
अस्सल च्यवनप्राश ५२ हून अधिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केला जातो. ज्यामध्ये आवळा, अश्वगंधा, विदारीकंद, सफेद मुसळी, शतावरी, अर्जुन, मंगीळा, ब्राह्मी, बला, मुलेढी, वासा, पुनर्नवा, जिवंती, कष्टकारी, हिरडा, गुरूची, दशमूळ, गायीचे तूप, शहद, गूळ या सगळ्या गोष्टी ग्राऊंड करून वापरल्या जातात. त्यानंतर विलायची, पिंपळी वंशलोचन, तमालपत्र, सुंठ, केशर आदी द्रव्ये मिक्स केली जातात.


च्यवनप्राश म्हणजे काय?
आयुर्वेद शास्त्रात चवनऋर्षीनी वार्धक्यावस्था दूर ठेवून तारुण्यावस्था प्राप्त करण्यासाठी एक रसायन औषधीचे सेवन केले व त्यांना तारुण्यावस्था प्राप्त झाली. तेव्हापासून 'त्या' रसायन औषधीचे नामकरण 'च्यवनप्राश' असे झाले, असे वर्णन आयुर्वेद शास्त्रात करण्यात आले आहे.


"च्यवनप्राशला रसायन औषधी म्हटले जाते. रसायन म्हणजेच जे शरीराला निरोगी, आरोग्यसंपन्न करते. तसेच वृद्धावस्था लवकर येऊ देत नाही. रोगप्रतिकारशक्ती शरीरबल, तेज, वाढवते. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशक्तपणा, जीर्ण, सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार, क्षयरोग आहे. त्यांनी इतर औषधांसह सकाळी एक ते दोन चमचे च्यवनप्राशचे सेवन करावे."
- डॉ. माधुरी धानोरकर, आयुर्वेदाचार्य, चंद्रपूर

Web Title: Chyawanprash that you are eating is genuine or fake?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.