Chandrapur Election Results 2026 : चंद्रपूर प्रभाग १ मध्ये उद्धवसेनेचे वर्चस्व, भाजपला एक जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:10 IST2026-01-16T13:09:00+5:302026-01-16T13:10:40+5:30
Chandrapur : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ (दे. गो. तुकुम) मधील निवडणूक निकाल जाहीर झाले असून या प्रभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वर्चस्व राखत चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला आहे.

Chandrapur Election Results 2026: Uddhav Sena dominates Chandrapur Ward 1, BJP wins one seat
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ (दे. गो. तुकुम) मधील निवडणूक निकाल जाहीर झाले असून या प्रभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वर्चस्व राखत चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
प्रभागातील अ गटातून शिल्पा चौधरी (उद्धवसेना), ब गटातून राहुल विरुटकर (उद्धवसेना) आणि क गटातून श्रुती घटे (उद्धवसेना) यांनी विजय मिळवून पक्षाचा झेंडा फडकावला आहे. ड गटातून भाजपचे सुभाष कासनगोट्टूवार यांनी विजय संपादन करत भाजपचे खाते उघडले आहे.
या निकालामुळे दे. गो. तुकुम परिसरात उद्धवसेनेचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान, भाजपच्या एका जागेवरील विजयामुळे पक्षाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी एकूण निकाल पाहता या प्रभागात उद्धवसेनेचे पारडे जड राहिले आहे.