Chandrapur Election Results 2026 : चंद्रपुरात मनसेचा फज्जा; १५ उमेदवार रिंगणात, मात्र खातेही उघडले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 18:31 IST2026-01-17T18:31:19+5:302026-01-17T18:31:52+5:30

Chandrapur : महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या ६६ जागांपैकी मनसेने १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.

Chandrapur Election Results 2026 : MNS's disgrace in Chandrapur; 15 candidates in the fray, but not even opening their accounts | Chandrapur Election Results 2026 : चंद्रपुरात मनसेचा फज्जा; १५ उमेदवार रिंगणात, मात्र खातेही उघडले नाही

Chandrapur Election Results 2026 : MNS's disgrace in Chandrapur; 15 candidates in the fray, but not even opening their accounts

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या ६६ जागांपैकी मनसेने १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र निकालात पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेत मनसेचे 'रेल्वे इंजिन' यावेळी धावलेच नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे यावेळी पक्ष चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने या अपेक्षांना सुरुंग लावला. विशेष म्हणजे, माजी नगरसेवक सचिन भोयर यांनाही यावेळी पराभव स्वीकारावा लागला. भोयर यांच्यासह एकाच प्रभागात दुसऱ्या गटातून त्यांचा भाऊही निवडणूक रिंगणात होता. मात्र मतदारांनी मनसेच्या उमेदवारांकडे पाठ फिरविली.

सचिन भोयर ज्या प्रभागातून २०१७मध्ये विजयी झाले होते, त्या प्रभागाचे आरक्षण यावेळी बदलले. त्यामुळे त्यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागली. नव्या प्रभागातील समीकरणे न जुळल्याने त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

मनसेच्या वरिष्ठ नेत्यांचेही दुर्लक्ष

चंद्रपूर महापालिकेत १५ जागांवर मनसेने निवडणूक लढविली. मात्र मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक काळात चंद्रपूरमध्ये एकही सभा किंवा बैठक घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा अभाव दिसून आला. त्यातच स्थानिक पातळीवरील गटबाजीने पक्षाचे मोठे नुकसान झाले. संघटनात्मक कमकुवतपणा, अपुरा प्रचार आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे मनसेला महापालिकेत खातेही उघडता आले नाही. निवडणुकीला प्रचार सुरु झाला तेव्हापासून मनसेने सोशल मीडियावर प्रचाराचा चांगलाच जोर धरला होता.

Web Title : चंद्रपुर नगर निगम चुनाव 2026 में मनसे खाता खोलने में विफल

Web Summary : चंद्रपुर में मनसे को झटका लगा, 15 उम्मीदवार उतारने के बावजूद कोई सीट नहीं जीत पाई। आंतरिक कलह और वरिष्ठ नेतृत्व की उदासीनता ने पार्टी के खराब प्रदर्शन में योगदान दिया। पूर्व पार्षद सचिन भोयर भी हार गए।

Web Title : MNS Fails to Open Account in Chandrapur Municipal Election 2026

Web Summary : MNS faced a setback in Chandrapur, failing to win any seats despite fielding 15 candidates. Internal strife and lack of senior leadership attention contributed to the party's poor performance. Even former corporator Sachin Bhoyar lost.