कोसदनी घाटात ट्रकला अपघात, चालक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 08:23 IST2020-03-01T08:23:03+5:302020-03-01T08:23:33+5:30
वाहन विठ्ठल देवकर रा. करंजखेड हे जखमी झाले आहेत

कोसदनी घाटात ट्रकला अपघात, चालक जागीच ठार
महागाव (यवतमाळ) : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव तालुक्यातील कोसदनी घाटात रविवारी चंद्रपूरवरून कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात चालक गणेश राठोड रा. आमनी ता. महागाव याचा जागीच मृत्यू झाला.
वाहन विठ्ठल देवकर रा. करंजखेड हे जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक (एमएच-२६-एच-६४८५) घाटात पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस चौकीचे अधिकारी विठ्ठल गुरपडे, मधुकर राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले. तर, स्थानिकांनीही अपघातस्थळावर येत मदत केली.