वैद्यकीय महाविद्यालयातील 35 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 23:20 IST2021-04-30T23:19:53+5:302021-04-30T23:20:52+5:30

अवघ्या 35 व्या वर्षी डॉ. चांदेकर यांचे असे सोडून जाणे अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे.

35-year-old medical college doctor, died beacuase of corona | वैद्यकीय महाविद्यालयातील 35 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू

वैद्यकीय महाविद्यालयातील 35 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू

चंद्रपूर : कोरोनाच्या विळख्यात नागरिकांची अविरत सेवा करणारे कोविड योद्धे डॉक्टर्स आले असून यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत डॉ. प्रशांत चांदेकर यांचा कोरोनाने निधन झाल्याने वैधकीय क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

अवघ्या 35 व्या वर्षी डॉ. चांदेकर यांचे असे सोडून जाणे अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. डॉ. चांदेकर हे शासकीय वैधकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर व औषधी विभागात कार्यरत होते. कोरोनाच्या भीषण काळात त्यांनी अनेक रुग्णांना सेवा दिली मात्र त्यांना सुद्धा कोरोनाने आपल्या बाहुपाशात ओढले.

डॉ. चांदेकर यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ऑक्सिजनची पातळी कमी होत असताना महिला रुग्णालयात त्यांना नेण्यात आले.ऑक्सिजनची पातळी सतत खालावल्याने त्यांना तात्काळ नागपूरला हलविण्यात आले मात्र वरोरा जवळ पोहचताच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

Web Title: 35-year-old medical college doctor, died beacuase of corona