lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Union Budget 2019: पेट्रोल ९, तर डिझेलचे दर ४ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता

Union Budget 2019: पेट्रोल ९, तर डिझेलचे दर ४ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता

भारतामध्ये डिझेलची दरवर्षी ८.३ कोटी टन तर पेट्रोलची २.८ कोटी टन विक्री होते. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलची फक्त एक तृतीयांश विक्री होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 05:45 AM2019-07-06T05:45:58+5:302019-07-06T05:50:02+5:30

भारतामध्ये डिझेलची दरवर्षी ८.३ कोटी टन तर पेट्रोलची २.८ कोटी टन विक्री होते. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलची फक्त एक तृतीयांश विक्री होते.

Union Budget 2019: Petrol 9 and diesel 4 rupees prices may increase | Union Budget 2019: पेट्रोल ९, तर डिझेलचे दर ४ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता

Union Budget 2019: पेट्रोल ९, तर डिझेलचे दर ४ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचे अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकारने ठरविले आहे. मात्र आगामी काळात पेट्रोलचे दर नऊ रुपये तर डिझेलचे दर चार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल.
या दरवाढीचे संकेत सरकारने अर्थसंकल्पात आहेत. सध्या पेट्रोल व डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढविण्याची अधिसूचना जारी होईल. वित्तीय कायदा २००२मध्ये त्यासाठी दुरुस्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर पेट्रोलच्या दरात ७ ते १० रुपयांपर्यंत आणि डिझेलच्या दरात १ ते ४ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाचे दर पाहाता पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढणे अपरिहार्य आहे.

- भारतामध्ये डिझेलची दरवर्षी ८.३ कोटी टन तर पेट्रोलची २.८ कोटी टन विक्री होते. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलची फक्त एक तृतीयांश विक्री होते.

डिझेल महागल्यास महागाई भडकेल
महागाई फार भडकू नये यासाठी पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर कमी असतात. मालवाहतुकीसाठी डिझेलची वाहने वापरली जातात.
त्यामुळे डिझेलचे दर खूप वाढविल्यास त्यामुळे मालवाहतूक खर्चही वाढेल. परिणामी सर्वच वस्तूंच्या किमती वाढून महागाईही आणखी भडकेल.

Web Title: Union Budget 2019: Petrol 9 and diesel 4 rupees prices may increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.