lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > TV Viewers : 1 डिसेंबरपासून टीव्ही पाहणे होणार महाग, 50 टक्के करावा लागेल अधिक खर्च 

TV Viewers : 1 डिसेंबरपासून टीव्ही पाहणे होणार महाग, 50 टक्के करावा लागेल अधिक खर्च 

TV Viewers May Have To Shell Out 50% More : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) मार्च 2017 मध्ये टीव्ही चॅनल्सच्या किंमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 01:18 PM2021-10-19T13:18:22+5:302021-10-19T13:18:30+5:30

TV Viewers May Have To Shell Out 50% More : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) मार्च 2017 मध्ये टीव्ही चॅनल्सच्या किंमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली होती.

TV Viewers May Have To Shell Out 50 Percent More From 1 December 2021 | TV Viewers : 1 डिसेंबरपासून टीव्ही पाहणे होणार महाग, 50 टक्के करावा लागेल अधिक खर्च 

TV Viewers : 1 डिसेंबरपासून टीव्ही पाहणे होणार महाग, 50 टक्के करावा लागेल अधिक खर्च 

नवी दिल्ली : जर तुम्हाला टीव्ही पाहण्याची आवड असेल तर तुमचा खर्चाचा बोजा वाढणार आहे. कारण, 1 डिसेंबरपासून टीव्ही चॅनल्सची बिले वाढणार आहेत. देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्स झी, स्टार, सोनी आणि Viacom18 ने काही चॅनल्स आपल्या बुकेतून बाहेर काढले आहेत. त्यामुळे टीव्ही पाहणाऱ्या ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत अधिक खर्च करावा लागू शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे या किंमती वाढत आहेत. (Come December 1, TV Viewers May Have To Shell Out 50% More)

दरम्यान, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) मार्च 2017 मध्ये टीव्ही चॅनल्सच्या किंमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली होती. त्यानंतर 1 जानेवारी 2020 रोजी NTO 2.0 जारी करण्यात आले. यामुळे, सर्व नेटवर्क NTO 2.0 नुसार त्यांच्या चॅनेलच्या किंमती बदलत आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे (TRAI) म्हणणे होते की,  NTO 2.0 ग्राहकांना फक्त तेच चॅनेल निवडण्याचा व पेमेंट करण्याचा पर्याय आणि स्वातंत्र्य देईल, जे त्यांना पाहायचे आहेत.

ब्रॉडकास्टिंग नेटवर्कच्या बुकेत ऑफर केलेल्या चॅनेलचे मासिक दर 15-25 रुपयांच्या दरम्यान ठेवले होते. परंतु टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) नवीन दर ऑर्डरमध्ये हे किमान 12 रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे चॅनल्ससाठी आपले बहुतेक चॅनल्स फक्त 12 रुपयांमध्ये देऊ करणे खूप नुकसानीचे ठरू शकते. हे नुकसान कमी करण्यासाठी, नेटवर्कने काही लोकप्रिय चॅनल्स बुकेमधून बाहेर काढून त्यांच्या किमती वाढवण्याचा मार्ग विचारात घेतला आहे.

किती रुपये होतील खर्च
स्टार प्लस, कलर्स, झी टीव्ही, सोनी आणि काही प्रादेशिक चॅनल्स सारखे लोकप्रिय चॅनल्स पाहण्यासाठी ग्राहकांना 35 ते 50 टक्के अधिक द्यावे लागतील. नवीन किंमतींबाबत एक सरासरी अंदाज धरला तर एखाद्या ग्राहकाला स्टार आणि डिस्ने इंडिया चॅनल पाहणे सुरू ठेवायचे असेल तर दरमहा 49 रुपयांऐवजी, त्याच संख्येच्या चॅनेलसाठी 69 रुपये मोजावे लागतील. तर सोनी चॅनलसाठी त्याला दर महिन्याला 39 ऐवजी 71 रुपये खर्च करावे लागतील. झीसाठी 39 रुपयांऐवजी दरमहा 49 रुपये आणि Viacom18 चॅनलसाठी दरमहा 25 रुपयांऐवजी 39 रुपये दरमहा खर्च होईल.

Web Title: TV Viewers May Have To Shell Out 50 Percent More From 1 December 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.