lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बंदीमुळे टिकटॉकला ६ अब्ज डॉलरचा फटका, चीनमधील कंपनीचा अहवाल

बंदीमुळे टिकटॉकला ६ अब्ज डॉलरचा फटका, चीनमधील कंपनीचा अहवाल

चीनबाहेर भारतामध्ये टिकटॉक अ‍ॅपचे वापरकर्ते सर्वाधिक (जगाच्या तुलनेमध्ये ३०.३ टक्के) असून, त्यांच्याकडून या अ‍ॅपचा वापर बंद झाल्यामुळे त्याच्या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता याबाबत चीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:29 AM2020-07-06T03:29:10+5:302020-07-06T07:32:01+5:30

चीनबाहेर भारतामध्ये टिकटॉक अ‍ॅपचे वापरकर्ते सर्वाधिक (जगाच्या तुलनेमध्ये ३०.३ टक्के) असून, त्यांच्याकडून या अ‍ॅपचा वापर बंद झाल्यामुळे त्याच्या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता याबाबत चीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

TickTock hits 6 billion loss due to ban, Chinese company reports | बंदीमुळे टिकटॉकला ६ अब्ज डॉलरचा फटका, चीनमधील कंपनीचा अहवाल

बंदीमुळे टिकटॉकला ६ अब्ज डॉलरचा फटका, चीनमधील कंपनीचा अहवाल

बीजिंग : भारताने ५९ चिनी अ‍ॅपवर घातलेल्या बंदीमुळे चिनी कंपन्यांना मोठा महसूल गमवावा लागण्याची भीती व्यक्त केली आहे. याबाबतचा एक अहवाल नुकताच चीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये युनिकॉर्न बाइटडान्स या कंपनीने टिकटॉक तसेच अन्य दोन अ‍ॅपवरील भारताच्या बंदीमुळे कंपनीला सहा अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

बाइटडान्स ही चीनमध्ये विकसित झालेल्या तंत्रज्ञानाची आॅनलाइन विक्री  करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीला  अनेक परदेशी सरकारांनी विरोध दर्शविला असून, त्यांच्याकडून ग्राहकांचा डाटा लिक होत असल्याच्या तक्रारीही आहेत. या कंपनीने सर्वात लोकप्रिय ठरलेले टिकटॉक व्हिडिओ अ‍ॅप बनविले असून, त्याच्यावर तसेच या कंपनीच्या अन्य दोन अ‍ॅपवर भारत सरकारने बंदी घातली आहे. भारताकडून यापुढे ग्राहक मिळणार नसल्याने या कंपनीला वर्षभरामध्ये सुमारे ६ अब्ज अमेरिकन डॉलर इतका तोटा होण्याची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय अन्य कंपन्यांच्या अ‍ॅपवरील बंदीमुळे त्यांना बसणारा फटका हा वेगळाच असणार आहे.

भारतातील वापर ३०.३ टक्के
टिकटॉक या चीनच्या व्हिडिओ अ‍ॅपला जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली असून, त्याचा वापर करणारेही अनेक जण आहेत. चीनबाहेर भारतामध्ये या अ‍ॅपचे वापरकर्ते सर्वाधिक (जगाच्या तुलनेमध्ये ३०.३ टक्के) असून, त्यांच्याकडून या अ‍ॅपचा वापर बंद झाल्यामुळे त्याच्या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता याबाबत चीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे टिकटॉकचा अन्य देशांमधील प्रसार कमी होण्याची भीती उत्पादकांना वाटत आहे. याशिवाय या उत्पादकाची व्हिगो व्हिडिओ आणि हॅलो हे अन्य दोन अ‍ॅपही बंद करण्यात आले आहेत. याशिवाय वुई चॅट व अन्य पाच मॅसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या अ‍ॅपवरही बंदी घालण्यात आली आहे. या सर्व अ‍ॅपचा भारतातील वापर थांबल्यामुळे त्यांच्या उत्पादकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: TickTock hits 6 billion loss due to ban, Chinese company reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.