lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > Trident Techlabs IPO listing: पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, ₹३५ चा शेअर ₹९८ वर झाला लिस्ट

Trident Techlabs IPO listing: पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, ₹३५ चा शेअर ₹९८ वर झाला लिस्ट

कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर 180.4 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 12:20 PM2023-12-29T12:20:23+5:302023-12-29T12:20:48+5:30

कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर 180.4 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाले.

Trident Techlabs IPO listing huge profit investors on first day rs 35 a share listed at rs 98 bse nse share market | Trident Techlabs IPO listing: पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, ₹३५ चा शेअर ₹९८ वर झाला लिस्ट

Trident Techlabs IPO listing: पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, ₹३५ चा शेअर ₹९८ वर झाला लिस्ट

ट्रायडंट टेकलॅब्सच्या गुंतवणूकदारांची आज चांदी झाली. कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमई (NSE SME) प्लॅटफॉर्मवर 180.4 टक्के प्रीमियमसह 98.15 रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाले. याची प्राईज बँड 33-35 रुपये होती. लिस्ट होण्यापूर्वी, कंपनीचे शेअर्स अनलिस्टेड मार्केटमध्ये 43 रुपयांच्या प्रीमियमसह ट्रेंड करत होते. 

ट्रायडेंट टेकलॅब्सचा 16 कोटी रुपयांचा IPO जवळपास 700 पट सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांच्या कॅटेगरीत याला 1000 पटींपेक्षा पेक्षा अधिक सबस्क्रिप्शन मिळालं. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स कॅटेगरीत 854 पट बोली मिळाल्या होत्या. तर क्युआयबी कॅटेगरीत 100 पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं.

कंपनीबाबत माहिती
कंपनीचा आयपीओ 21 डिसेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि 26 डिसेंबर रोजी बंद झाला. या कालावधीत कंपनीनं 45.8 लाख नवीन शेअर्स विक्रीसाठी ठेवले होते. कंपनी एरोस्पेस, डिफेन्स, ऑटोमोटिव्ह, टेलिकॉम, मेडिकल, सेमीकंडक्टर आणि पॉवर डिस्ट्रिब्युशन क्षेत्रातील कंपन्यांना कस्टम बिल्ट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स ऑफर करते. इंजिनिअरिंग सोल्यूशन्स आणि पॉवर सिस्टम सोल्यूशन्स हे त्याचे दोन बिझनेस वर्टिकल्स आहेत.

ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीचा महसूल 21 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 2.66 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल 67 कोटी रुपये होता आणि नफा 5.54 कोटी रुपये होता.

Web Title: Trident Techlabs IPO listing huge profit investors on first day rs 35 a share listed at rs 98 bse nse share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.