lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट...

बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट...

Patanjali Foods Share: बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील पतंजलीचे शेअर्स मंगळवारी 7% ने वाढले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:18 PM2024-04-17T17:18:46+5:302024-04-17T17:19:36+5:30

Patanjali Foods Share: बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील पतंजलीचे शेअर्स मंगळवारी 7% ने वाढले.

Patanjali Foods Share: Good news for Baba Ramdev; Foreign investment in Patanjali increased, share in upper circuit... | बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट...

बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट...

Patanjali Foods Share: योगगुरू बाबा रामदेव यांच्या मालकीची FMCG कंपनी पतंजली फूड्सचे (Patanjali Foods) शेअर्स मंगळवारी फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 7% वाढ झाली आणि हा शेअर 1424.10 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक बातमी आहे. परदेशी इनव्हेस्टमेंट फर्म GQG Partners ने मार्च तिमाहीत पतंजली फूड्समधील आपला हिस्सा वाढवला आहे. 

GQG Partners ने मार्च 2024 च्या तिमाहीत पतंजली फूड्समधील आपला हिस्सा 11.48% पर्यंत वाढवला. यापूर्वी डिसेंबर 2023 च्या तिमाहीत हिस्सा 3.3% होता. यामुळे बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील FMCG फर्मचे शेअर्स मंगळवारी 6.62% वाढून 1424.10 रुपयांवर पोहोचले. दिवसा अखेर BSE वर पतंजली फूड्सचे शेअर्स 5.41% वाढून 1407.70 रुपयांवर बंद झाले.

वर्षभरात 45% ने वाढ
पतंजली फूड्सचे शेअर्स एका वर्षात 45% वाढले आहेत. तर, गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 6.57% वाढला आहे. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासून यात 10.40% ची घसरण झाली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 50,856 कोटी रुपये आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Patanjali Foods Share: Good news for Baba Ramdev; Foreign investment in Patanjali increased, share in upper circuit...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.