Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > मुकेश अंबानींच्या कंपनीची हॅट्ट्रिक! तीन दिवसांत केली ₹१.३५ लाख कोटींची कमाई...

मुकेश अंबानींच्या कंपनीची हॅट्ट्रिक! तीन दिवसांत केली ₹१.३५ लाख कोटींची कमाई...

रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या तीन व्यापार सत्रांपासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:03 IST2026-04-29T14:02:06+5:302026-04-29T14:03:16+5:30

रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या तीन व्यापार सत्रांपासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.

Mukesh Ambani's company's hat trick! Earned ₹1.35 lakh crore in three days... | मुकेश अंबानींच्या कंपनीची हॅट्ट्रिक! तीन दिवसांत केली ₹१.३५ लाख कोटींची कमाई...

मुकेश अंबानींच्या कंपनीची हॅट्ट्रिक! तीन दिवसांत केली ₹१.३५ लाख कोटींची कमाई...

Reliance Industries Share : देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या तीन व्यापार सत्रांपासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

तीन दिवसांत ७.५% वाढ

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी रिलायन्सचा शेअर १,३२७.६५ रुपयांवर होता. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत शेअरमध्ये सुमारे १०० रुपयांची, म्हणजेच ७.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सोमवारी जवळपास ३% वाढ, मंगळवारी १.६८% आणि बुधवारी ३% पर्यंत तेजी नोंदवली गेली.

बाजार घसरला तरी रिलायन्स तेजीत

विशेष म्हणजे, BSE Sensex आणि Nifty-50 मध्ये घसरण दिसून येत असतानाही रिलायन्सचे शेअर्स मजबूत राहिले. बुधवारी दुपारी १:०० वाजता कंपनीचा शेअर सुमारे २% वाढीसह १,४१६ रुपयांवर व्यवहार करत होता. सत्रादरम्यान तो १,४२७.४० रुपयांपर्यंत गेला, जो दिवसातील उच्चांक ठरला.

मार्केट कॅपमध्ये १.३५ लाख कोटींची भर

या तेजीचा थेट परिणाम कंपनीच्या एकूण मूल्यांकनावर झाला आहे. फक्त तीन दिवसांत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल १.३५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात मार्केट कॅप १७.९६ लाख कोटी रुपये, जे सध्या १९.३१ लाख कोटी रुपये झाले आहे. विश्लेषकांच्या मते, ही तेजी अशीच कायम राहिली तर Reliance Industriesचे मार्केट कॅप लवकरच २० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : रिलायंस इंडस्ट्रीज की हैट्रिक: तीन दिनों में ₹1.35 लाख करोड़ की कमाई!

Web Summary : तिमाही नतीजों के बाद रिलायंस इंडस्ट्रीज के शेयरों में लगातार तीन सत्रों में तेजी आई। निवेशकों के विश्वास से 7.5% की वृद्धि हुई, जिससे बाजार पूंजीकरण में ₹1.35 लाख करोड़ की वृद्धि हुई और यह ₹19.31 लाख करोड़ तक पहुंच गया।

Web Title : Reliance Industries Achieves Hat-Trick: ₹1.35 Lakh Crore Gain in Three Days!

Web Summary : Reliance Industries shares surged for three consecutive sessions post-earnings. Investor confidence fueled a 7.5% rise, adding ₹1.35 lakh crore to its market cap, reaching ₹19.31 lakh crore despite market volatility.