lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > वर्षभरात ₹११२ वरुन ₹३३०० पार गेला शेअर, गुंतवणूकदारांची चांदी; आता कंपनी देतेय ६ बोनस शेअर्स

वर्षभरात ₹११२ वरुन ₹३३०० पार गेला शेअर, गुंतवणूकदारांची चांदी; आता कंपनी देतेय ६ बोनस शेअर्स

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 33 टक्के वाढ झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:29 PM2024-03-15T12:29:25+5:302024-03-15T12:32:45+5:30

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 33 टक्के वाढ झाली आहे. 

Kesar India Shares go from rs 112 to rs 3300 in a year investors huge profit Now the company is giving 6 bonus shares 2800 percent hike | वर्षभरात ₹११२ वरुन ₹३३०० पार गेला शेअर, गुंतवणूकदारांची चांदी; आता कंपनी देतेय ६ बोनस शेअर्स

वर्षभरात ₹११२ वरुन ₹३३०० पार गेला शेअर, गुंतवणूकदारांची चांदी; आता कंपनी देतेय ६ बोनस शेअर्स

केसर इंडिया (Kesar India) या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे. 5% च्या अपर सर्किटसह घसरणीच्या बाजारातही केसर इंडियाचा शेअर शुक्रवारी 3342.75 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात कंपनीचे शेअर्स 112 रुपयांवरून 3300 रुपयांपर्यंत वाढले आहेत. केसर इंडियाच्या शेअर्सनं या कालावधीत गुंतवणूकदारांना 2800 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिला आहे. स्मॉलकॅप कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची भेट देणार आहे.
 

6 बोनस शेअर्स देणार कंपनी 
 

केसर इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना 6:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक शेअरमागे गुंतवणूकदारांना 6 बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 19 मार्च 2024 निश्चित केली आहे. कंपनी पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. केसर इंडियाच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 4319.85 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 112 रुपये आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 227% वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 1024.65 रुपयांवर होते, जे आता 3342.75 रुपयांवर पोहोचले आहेत.  
 

6 महिन्यांमध्ये 1207% तेजी
 

गेल्या 6 महिन्यात केसर इंडियाच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 255.60 रुपयांवर होते. 15 मार्च 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 3342.75 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 1207% ची मोठी वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीने सहा महिन्यांपूर्वी केसर इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर या शेअर्सचं सध्याचे मूल्य 13.07 लाख रुपये झालं असते. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 33 टक्के वाढ झाली आहे. 
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Kesar India Shares go from rs 112 to rs 3300 in a year investors huge profit Now the company is giving 6 bonus shares 2800 percent hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.