lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजार 850 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना 5 लाख कोटींचा फटका

शेअर बाजार 850 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना 5 लाख कोटींचा फटका

इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जगभरातील अनेक शेअर बाजारांवर पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 04:51 PM2024-04-15T16:51:38+5:302024-04-15T16:51:52+5:30

इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जगभरातील अनेक शेअर बाजारांवर पाहायला मिळाला.

indian stock market crashed by 850 points, costing investors Rs 5 lakh crore | शेअर बाजार 850 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना 5 लाख कोटींचा फटका

शेअर बाजार 850 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना 5 लाख कोटींचा फटका

Stock Market Closing On 15 April 2024: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर पाहायला मिळाला. भारतीय शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. बँकिंग आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 845 अंकांच्या घसरणीसह 73,399 अंकांवर तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा NIFTI 247 अंकांच्या घसरणीसह 22,272 अंकांवर बंद झाला. 

गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटींचे नुकसान 
शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे लिस्टेड शेअर्सचे बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयांनी घटले आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, एकूण मार्केट कॅप 394.72 लाख कोटी रुपयांवर आले, जे गेल्या सत्रात 399.76 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात बाजार भांडवल 5.04 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

सर्व क्षेत्रांत घसरण
आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. केवळ तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले.
 

Web Title: indian stock market crashed by 850 points, costing investors Rs 5 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.