lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > तुमच्याकडे स्मॉलकॅपचे शेअर्स आहेत का?; निर्देशांकात झालीय वाढ

तुमच्याकडे स्मॉलकॅपचे शेअर्स आहेत का?; निर्देशांकात झालीय वाढ

स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये २८६६.३७ अंशांनी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 01:15 PM2024-04-08T13:15:49+5:302024-04-08T13:17:06+5:30

स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये २८६६.३७ अंशांनी वाढ झाली आहे.

Do you own smallcap shares? | तुमच्याकडे स्मॉलकॅपचे शेअर्स आहेत का?; निर्देशांकात झालीय वाढ

तुमच्याकडे स्मॉलकॅपचे शेअर्स आहेत का?; निर्देशांकात झालीय वाढ

प्रसाद गो. जोशी
भारतामधील सेवा क्षेत्राचा पीएमआय उच्चांकी पोहोचल्याने सेवा क्षेत्राच्या समभागांमधील उलाढाल वाढली आहे. स्मॉलकॅप निर्देशांकाने ४६ हजारांचा टप्पा पार करतानाच गत सप्ताहामध्ये चांगली वाढही दिली. यामुळे आगामी सप्ताहामध्ये सेवा क्षेत्र व स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे. 
या क्षेत्राकडून बाजाराला चांगली वाढ मिळू शकेल. गत सप्ताहामध्ये स्मॉलकॅपच्या शेअर्समध्ये चांगली उलाढाल झाली. स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये २८६६.३७ अंशांनी वाढ झाली आहे. या निर्देशांकाने ४६ हजारांच्या पुढे मजल मारल्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा त्याकडे वाढलेला दिसून येत आहे.

nरिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण ठरविणाऱ्या समितीने रेपो रेट कायम ठेवला असला तरी येत्या काळात वातावरणातील बदलामुळे अन्नधान्याच्या किमती वाढण्याचा इशारा आहे. महागाईच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चांगला राहिल्याने व्याजदरात कपातीची शक्यता मंदावली आहे. 

परकीय वित्तसंस्थांची वर्षभरात मोठी गुंतवणूक

nगेली दोन वर्षे भारतीय बाजारामध्ये सातत्याने विक्री करणाऱ्या परकीय वित्तसंस्थांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ३ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याने भारतीय बाजारावरील त्यांचा विश्वास वाढीला लागल्याचे मानले जात आहे. 

nगेली काही वर्षे भारत हे परकीय वित्तसंस्थांच्या गुंतवणुकीसाठीचे महत्त्वाचे केंद्र होते. मात्र, २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षांमध्ये या संस्थांनी विक्री केलेली आढळून आली. २०२३-२४ मध्ये परकीय वित्तसंस्थांनी बाजारामध्ये ३ लाख ३९ हजार ६४.६२ कोटींची गुंतवणूक केली आहे.

nभारतीय बाजारासाठी ही आनंदाची बातमी आहे. या संस्थांनी २ लाख ८ हजार २११. २४ कोटी रुपये  शेअर्समध्ये, तर १ लाख २१ हजार ५८.८४ कोटी कर्जरोख्यात गुंतविले आहेत. त्यामुळे हे वर्ष शेअर बाजाराला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकते. 

Web Title: Do you own smallcap shares?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.