Lokmat Money >शेअर बाजार > बाबा रामदेव यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे ७ हजार कोटी बुडाले

बाबा रामदेव यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे ७ हजार कोटी बुडाले

आठवडाभरात कंपनीच्या बाजार भांडवलात ७ हजार कोटींची घट झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 06:52 PM2023-02-04T18:52:29+5:302023-02-04T18:53:02+5:30

आठवडाभरात कंपनीच्या बाजार भांडवलात ७ हजार कोटींची घट झाली आहे.

Big fall in Baba Ramdev s company shares patanjali foods investors lost 7 thousand crores huge loss share market bse nse investment | बाबा रामदेव यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे ७ हजार कोटी बुडाले

बाबा रामदेव यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे ७ हजार कोटी बुडाले

योगगुरू रामदेव यांच्या पतंजली फूड्सच्या सूचिबद्ध कंपनीच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या एका आठवड्यापासून पतंजली फूड्सचा शेअर सातत्याने घसरत आहे. यामुळे कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे 7000 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

3 फेब्रुवारी रोजी, आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी पतंजली फूड्सचे शेअर्स लोअर सर्किटवर आले आणि 903.35 रुपयांपर्यंत घसरले. तथापि, व्यापाराच्या शेवटी, शेअरची किंमत 906.80 रुपयांवर आली. यापूर्वीच्या तुलनेत यात 4.63 टक्क्यांची ची घसरण झाली. त्याच वेळी, कंपनीचे मार्केट कॅप 32,825.69 कोटी रुपये झाले आहे.

आठवडाभरापूर्वी म्हणजेच 27 जानेवारीला शेअरचा भाव 1102 रुपयांच्या पातळीवर होता. त्याच वेळी, बाजार भांडवल सुमारे 40 हजार कोटी रुपयांच्या पातळीवर राहिले. या संदर्भात आठवडाभरात बाजार भांडवलात 7 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे आणि हे गुंतवणूकदारांचे नुकसान दर्शवते.

कंपनी नफ्यात
पतंजली फूड्सने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा नफा 15 टक्क्यांनी वाढून 269 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 234 कोटी रुपये होता. पतंजली फूड्सचा महसूल 26 टक्क्यांनी वाढून 7,929 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो एका वर्षापूर्वी 6,280 कोटी रुपये होता. 

तथापि, ही आकडेवारी विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा कमी आहे, कारण जास्त मार्जिन व्यवसायांमध्ये दबाव दिसून येऊ शकतो. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि इतर खर्चामुळे त्याची ऑपरेटिंग कामगिरी दबावाखाली राहिली.

(टीप - या लेखात शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Big fall in Baba Ramdev s company shares patanjali foods investors lost 7 thousand crores huge loss share market bse nse investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.