lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > ₹७०० वरुन ₹२ वर आला शेअर, आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; सरकारच्या निर्णयाचा परिणाम

₹७०० वरुन ₹२ वर आला शेअर, आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; सरकारच्या निर्णयाचा परिणाम

कंपनीच्या शेअर्समध्ये ही सकारात्मक हालचाल कंपनीशी संबंधित काही बातम्यांमुळे झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 09:27 AM2024-02-10T09:27:43+5:302024-02-10T09:34:00+5:30

कंपनीच्या शेअर्समध्ये ही सकारात्मक हालचाल कंपनीशी संबंधित काही बातम्यांमुळे झाली आहे.

anil ambani reliance communications Share falls from rs 700 to rs 2 now investors rush to buy Effect of Government Decision | ₹७०० वरुन ₹२ वर आला शेअर, आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; सरकारच्या निर्णयाचा परिणाम

₹७०० वरुन ₹२ वर आला शेअर, आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; सरकारच्या निर्णयाचा परिणाम

Reliance Communications share: अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तुफान तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअर्समध्ये ही सकारात्मक हालचाल कंपनीशी संबंधित काही बातम्यांमुळे झाली आहे. त्यातही केंद्र सरकारनं घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचा परिणाम शेअरवर दिसून आला.
 

काय आहे सरकारचा निर्णय?
 

सरकारनं ९६,३१७.६५ कोटी रुपयांच्या आधार मूल्यावर मोबाईल फोन सेवांसाठी आठ स्पेक्ट्रम बँडमध्ये लिलाव करण्यास मान्यता दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या काही दूरसंचार कंपन्यांकडे असलेले स्पेक्ट्रमही या लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या स्पेक्ट्रमचा कालावधी या वर्षी संपत आहे. दरम्यान, रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सची (CoC) शुक्रवारी बैठक झाली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, सीओसीची ही ४५ वी बैठक आहे. 
 

गुंतवणूकदार मालामाल
 

आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे शेअर्स ४.७० टक्क्यांनी वाढून २.४५ रुपयांवर बंद झाले. या आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअरनं मोठा नफा मिळवून दिलाय. १३ डिसेंबर २०२३ रोजी शेअरची किंमत २.४९ रुपये होती. हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. २००८ मध्ये हा शेअर ७०० रुपयांच्या पुढे होता. या हिशोबानं या शेअरमध्ये ९९ टक्क्यांची घसरण झालीये. या कंपनीत अनिल अंबानी कुटुंबीयांकडे २ टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा आहे.
 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: anil ambani reliance communications Share falls from rs 700 to rs 2 now investors rush to buy Effect of Government Decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.