lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > आज काय झालं? तेजीत असणारे अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स कोसळले; जाणून घ्या डिटेल्स...

आज काय झालं? तेजीत असणारे अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स कोसळले; जाणून घ्या डिटेल्स...

Adani Group Stocks: सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर शुक्रवारी अदानी ग्रुपचे सर्व शेअर मोठ्या प्रमाणात घसरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 03:25 PM2023-12-08T15:25:49+5:302023-12-08T15:26:24+5:30

Adani Group Stocks: सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर शुक्रवारी अदानी ग्रुपचे सर्व शेअर मोठ्या प्रमाणात घसरले.

adani-groups-shares-fell-including-adani-total-gas-energy-solution-enterprise-mdtv | आज काय झालं? तेजीत असणारे अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स कोसळले; जाणून घ्या डिटेल्स...

आज काय झालं? तेजीत असणारे अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स कोसळले; जाणून घ्या डिटेल्स...

Adani Group Stocks: एकीकडे निफ्टीने आज नवा उच्चांक गाठला, तर दुसरीकडे अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. गेल्या तीन दिवसांपासून अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून येत होती. अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशनच्या स्टॉक्सने एका आठवड्यात 25 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले. मात्र, आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हे सर्व शेअर्स कोसळले.

अदानींच्या या शेअर्समध्ये मोठी घसरण
अदानी ग्रुपमधील अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. शुक्रवारी अदानी एनर्जी सोल्यूशन्सचे शेअर्स NSE वर 6.14% ने येऊन खाली रु. 1,125.05 वर व्यवहार करत होते. या शेअरने एका आठवड्यात 24.29% परतावा दिला आहे. यानंतर अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये 6.04% घसरण पाहायला मिळाली. या कंपनीच्या शेअरने गेल्या पाच दिवसांत 38.24% परतावा दिला आहे. 

अदानी टोटल गॅस स्टॉक्स
गौतम अदानी यांची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअरदेखील आज 2.58% घसरून 2,812.65 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होते. याशिवाय, अदानी पोर्टचा स्टॉक सुमारे 3 टक्क्यांनी घसरून 1000 रुपयांवर आला. गेल्या काही दिवसांत जोरदार वाढलेल्या अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्येही शुक्रवारी 0.50% घट दिसून आली. या शेअरने गेल्या पाच दिवसांत 52.84 टक्के परतावा दिला आहे. 

अदानींचा हा शेअरही 7 टक्क्यांनी घसरला
गौतम अदानी यांच्या सिमेंट स्टॉकमध्येही घसरण दिसून येत आहे. एसीसी शेअर्स 1.22 टक्क्यांनी घसरून 2,115.50 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होते. अंबुजा सिमेंट 3.52% घसरून 487.30 रुपये प्रति शेअर वर व्यवहार करत होता. तर अदानी समूहाचा NDTV स्टॉक 7.10% घसरुन 268.70 रुपये प्रति शेअरवर आला. याशिवाय, अदानी विल्मर सुमारे 4 टक्क्यांनी घसरून 380 रुपये प्रति शेअर आणि अदानी पॉवर 5.25 टक्क्यांनी घसरून 532.90 रुपयांवर आला.

निफ्टी नवीन पातळीवर
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (आरबीआय रेपो रेट) बदल करण्याच्या निर्णयानंतर निफ्टीने नवा उच्चांक गाठला. निफ्टीने प्रथमच 21000 चा आकडा गाठला. निफ्टीने जानेवारीपासून 15.36% ची उडी नोंदवली आहे, तर गेल्या सहा महिन्यांत 12.65% ची उसळी घेतली आहे. सेन्सेक्सही 70 हजारांच्या जवळ आहे.

(टीप- हा गुंतवणूककीचा सल्ला नसून, फक्त माहिती आहे. शेअर मार्केटमध्ये गंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: adani-groups-shares-fell-including-adani-total-gas-energy-solution-enterprise-mdtv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.