lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > धरणीकंपातही स्मॉलकॅप जोरात

धरणीकंपातही स्मॉलकॅप जोरात

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ हा वाढीने झाला. सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये निर्देशांकाने वाढ दाखविली. त्यानंतर मात्र तो खाली येत गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:10 AM2021-03-01T05:10:55+5:302021-03-01T05:11:07+5:30

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ हा वाढीने झाला. सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये निर्देशांकाने वाढ दाखविली. त्यानंतर मात्र तो खाली येत गेला.

Smallcap loud even in earthquakes | धरणीकंपातही स्मॉलकॅप जोरात

धरणीकंपातही स्मॉलकॅप जोरात

- प्रसाद गो. जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क 
अमेरिकेमधील बॉण्डसवरील परतावा वाढत असल्याने शेअर बाजाराच्या अस्थिरतेमधून बाहरे पडण्याचा मार्ग गुंतवणूकदारांनी पत्करला आणि बाजारात शुक्रवारी धरणीकंप झाला. असे असले तरी बाजाराच्या या पडझडीमधून वाचला आहे तो स्मॉलकॅप निर्देशांक. महापुरे झाडे जाती या उक्तीप्रमाणे बाजारातील मोठ्या कंपन्यांचे दर कोसळत असताना लहान लहान कंपन्यांनी मात्र फायदा कमवित आपली चमक दाखविली, हे गतसप्ताहाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. 


मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ हा वाढीने झाला. सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये निर्देशांकाने वाढ दाखविली. त्यानंतर मात्र तो खाली येत गेला. शुक्रवारी जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्यामुळे भारतातील बाजारही कोसळला. त्यामुळे बाजाराच्या निर्देशांकाने ५० हजारांची पातळीही सोडली. आता बाजार पुन्हा ५० हजारांच्या उंबरठ्यावर आला आहे. बाजारातील १० प्रमुख कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये मोठी घट झाल्याचे दिसून आले. 
शुक्रवारी सायंकाळी जाहीर झालेली जीडीपीबाबतची आकडेवारी आशादायक आहे. मात्र, ही आकडेवारी जाहीर होण्यापूर्वीच बाजार बंद झाला होता. त्यामुळे या सकारात्मक बाबीचा बाजारावर कसा परिणाम हाेणार ते सोमवारी दिसून येणार आहे. स्मॉलकॅप निर्देशांकाचा अपवाद वगळता बाजाराचे सर्व प्रमुख निर्देशांक घसरलेले दिसून आले. 


परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी
परकीय वित्तसंस्थांनी फेब्रुवारी महिन्यात भारतीय शेअर बाजारामध्ये २३,६६३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सलग दुसऱ्या महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांची खरेदी सुरू आहे. महिनाभरात या संस्थांनी समभागांमध्ये २५,७८७ कोटी रुपये गुंतविले आहेत. मात्र, याच काळात त्यांनी बॉण्डस‌मधून २१२४ कोटी रुपये काढून घेतले आहेत. जानेवारी महिन्यातही या संस्थांनी भारतीय बाजारात १४,६४९ कोटी रुपये गुंतविले आहेत. 


अनिश्चितता राहणार
आगामी सप्ताहामध्ये जागतिक बाजारांमधील स्थिती, खनिज तेलाच्या किमती, अर्थव्यवस्थेबाबत जाहीर होणारी आकडेवारी यावरून बाजाराची दिशा ठरणार आहे. बाजारात असलेली सद्यस्थिती बघता येते काही दिवस गुंतवणूकदार शांत राहण्याची शक्यता दिसून येत आहे. 
 

Web Title: Smallcap loud even in earthquakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.