lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > महिलांनो आता डब्यात नको थेट पोस्टातच साठवा पैसे, मिळतोय मोठा परतावा

महिलांनो आता डब्यात नको थेट पोस्टातच साठवा पैसे, मिळतोय मोठा परतावा

पोस्ट ऑफिसच्या सर्वसामान्यांसोबत महिलांसाठीही खास योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:07 AM2024-02-20T10:07:11+5:302024-02-20T10:07:48+5:30

पोस्ट ऑफिसच्या सर्वसामान्यांसोबत महिलांसाठीही खास योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येते.

post office investment schemes for woman mahila sanman bachat pramanpatra government scheme investment tips huge return | महिलांनो आता डब्यात नको थेट पोस्टातच साठवा पैसे, मिळतोय मोठा परतावा

महिलांनो आता डब्यात नको थेट पोस्टातच साठवा पैसे, मिळतोय मोठा परतावा

पोस्ट ऑफिसच्या सर्वसामान्यांसोबत महिलांसाठीही खास योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येते आणि सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणुकीची हमीदेखील मिळते, यापैकी एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना आहे.
 

कोण गुंतवणूक करू शकतं?
 

ही बचत योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.
महिला स्वतःसाठी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. याशिवाय पती पत्नीसाठीही या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
या योजनेत किमान १००० रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल. कमाल दोन लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करू शकता. 
 

योजनेवर मिळणार कर सवलत 
 

महिला सन्मान बचत पत्र या योजनेवर मिळणाऱ्या व्याजावर कर लावला जातो, म्हणजेच ही योजना करमुक्त नाही. ही योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. या योजनेत, आयकर कायदा ८०-सी अंतर्गत कर लाभाचा लाभ दिला जातो; मात्र योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. याचा अर्थ या योजनेवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लाभ उपलब्ध नाही. व्याजावर टीडीएस कापला जातो. 
 

ही आहेत योजनेची वैशिष्ट्ये
 

या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. गुंतवणुकीची मर्यादा किमान १००० रुपये ते कमाल दोन लाख आहे. तर केंद्र सरकार ७.५ टक्के व्याज देते. हे व्याज तिमाही आधारावर जमा केले जाते. पहिल्या वर्षानंतर खातेदार ४० टक्के रक्कम काढू शकतात.

Web Title: post office investment schemes for woman mahila sanman bachat pramanpatra government scheme investment tips huge return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.