lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > Pakistan Economic Crisis : पाकिस्तानातील परिस्थितीने भारतीय कंपन्या चिंतेत; टाटा-जिंदालच्या व्यवसायावर होणार मोठा परिणाम

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानातील परिस्थितीने भारतीय कंपन्या चिंतेत; टाटा-जिंदालच्या व्यवसायावर होणार मोठा परिणाम

Pakistan Economic Crisis : टाटा आणि जिंदालसह अनेक कंपन्यांचे पाकिस्तानता व्यवसाय सुरू आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 01:38 PM2023-01-22T13:38:52+5:302023-01-22T13:39:25+5:30

Pakistan Economic Crisis : टाटा आणि जिंदालसह अनेक कंपन्यांचे पाकिस्तानता व्यवसाय सुरू आहेत.

Pakistan Economic Crisis: Indian companies are worried about the situation in Pakistan; Tata-Jindal's business will have a big impact | Pakistan Economic Crisis : पाकिस्तानातील परिस्थितीने भारतीय कंपन्या चिंतेत; टाटा-जिंदालच्या व्यवसायावर होणार मोठा परिणाम

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानातील परिस्थितीने भारतीय कंपन्या चिंतेत; टाटा-जिंदालच्या व्यवसायावर होणार मोठा परिणाम

Pakistan Economic Crisis : महागाई आमि परकीय चलनात झालेल्या घटमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Pakistan Economic Crisis) डबघाईला आली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकार परदेशातून आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत मागत आहे, पण त्यांना कोणीही कर्ज देण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानची अवस्था श्रीलंकेसारखी होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, याचा परिणाम फक्त पाकिस्तानवरच नाही, तर भारतीय कंपन्यांवरही होईल.

टाटा आणि जिंदाल ग्रुपचा पाकिस्तानात व्यवसाय
टाटा समूह पाकिस्तानच्या वस्त्रोद्योग आणि दूरसंचार उद्योगात सक्रिय आहे. टाटाने पाकिस्तानातील उद्योगपतीसोबत मिळून टेक्सटाईल्स मिल्स लिमिटेड ही कापूस धाग्याचे आणि फॅब्रिकचे उत्पादन करणारी एक मोठी कंपनी तिथे उभारली आहे. तर, टाटा टेली सर्व्हिसेस पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन कंपनी लिमिटेड (PTCL) देखील तिथे भागीदारीत व्यवसाय करते. हा संयुक्त उपक्रम पाकिस्तानमध्ये दूरसंचार आणि ब्रॉडबँड सेवा पुरवतो.

भारतातील दिग्गज स्टील कंपनी जिंदाल स्टीलचाही पाकिस्तानात मोठा व्यवसाय आहे. जिंदाल कुटुंबीय आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे व्यावसायिक संबंध सर्वश्रुत आहेत. जिंदाल स्टील पाकिस्तानच्या ऊर्जा क्षेत्रातही सक्रिय आहे, त्यामुळे या इस्लामिक देशात सुरू असलेल्या दुर्दशेचा या भारतीय कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आयात-निर्यातीवरही परिणाम होणार आहे
पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या वाईट आर्थिक स्थितीमुळे दोन्ही देशांमधील आयात-निर्यात सारख्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार, 2021 मध्ये पाकिस्तानने भारताकडून सुमारे 503 दशलक्ष डॉलर्सची आयात केली होती. यामध्ये वैद्यकीय उत्पादने, रसायने, साखर आणि प्लास्टिकच्या वस्तू भारतातून पाकिस्तानात पाठवण्यात आल्या. पाकिस्तानात परिस्थिती आणखी बिघडली तर आयात-निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन पाकिस्तानात माल निर्यात करणाऱ्या भारतीय कंपन्यांचा व्यवसाय कमी होऊ शकतो.
 

Web Title: Pakistan Economic Crisis: Indian companies are worried about the situation in Pakistan; Tata-Jindal's business will have a big impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.