lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > रोज करा १०० रुपयांची गुंतवणूक, बनू शकतो ४ कोटींचा फंड; आयुष्य बनेल टेन्शन फ्री

रोज करा १०० रुपयांची गुंतवणूक, बनू शकतो ४ कोटींचा फंड; आयुष्य बनेल टेन्शन फ्री

जितक्या लवकर तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन सुरू कराल तितक्या लवकर तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य कराल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 09:53 AM2023-12-31T09:53:59+5:302023-12-31T09:54:43+5:30

जितक्या लवकर तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन सुरू कराल तितक्या लवकर तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य कराल.

Invest 100 rupees daily you can make a fund of 4 crores Life will become tension free mutual fund sip investment | रोज करा १०० रुपयांची गुंतवणूक, बनू शकतो ४ कोटींचा फंड; आयुष्य बनेल टेन्शन फ्री

रोज करा १०० रुपयांची गुंतवणूक, बनू शकतो ४ कोटींचा फंड; आयुष्य बनेल टेन्शन फ्री

तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका तुम्हाला कमी वयात चांगला नफा मिळू शकतो. जितक्या लवकर तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन सुरू कराल तितक्या लवकर तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य कराल. निश्चितरित्या व्याज देत असलेल्या स्कीम्सच्या तुलनेत अधिक व्याज मिळत असल्यानं मार्केट लिंक्ड रिटर्न्स गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. गेल्या पाच वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणूक हा लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास आला आहे. जर तुम्हाला एसआयपीद्वारे पैसे कमवायचे असतील तर दीर्घकालीन गुंतवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे.

तुम्हाला म्युच्युअल फंडात ३० वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्हाला अंदाजे १५ टक्के परतावा मिळाला, तर कोट्यधीश होण्याचा मार्ग खूप सोपा होतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज. मूळ रक्कम दरवर्षी बदलत असल्यानम, दरवर्षी १५ टक्के परतावा तुम्हाला मोठा निधी तयार करण्यात मदत करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचूक एसआयपी फॉर्म्युला जाणून घेणे, जे एसआयपीमध्ये मूल्य वाढवेल. हे सूत्र स्टेप अप एसआयपी म्हणून ओळखले जाते. तुम्हाला केवळ दरवर्षी १० टक्के स्टेप-अप रेट राखावा लागेल.

स्टेप अप एसआयपी

  • तुमचं वय ३० वर्षे असेल. तर दररोज १०० रुपये वाचवा आणि एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा.
  • ३० वर्षांसाठी गुंतवणूकीचं लक्ष्य ठेवा. दरवर्षी १० टक्के स्टेप-अप करत रहा.
  • जर तुम्ही ३००० रुपयांपासून सुरुवात केली तर पुढच्या वर्षी तुम्हाला एसआयपी ३०० रुपयांनी वाढवावी लागेल.
  • ३० वर्षांनंतर तुमची मॅच्युरिटी रक्कम ४,१७,६३,७०० रुपये (४.१७ कोटी) होईल.
  • SIP कॅल्क्युलेटरनुसार, ३० वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक ५९,२१,७८५ (५९.२२ लाख) असेल.
  • येथे तुम्हाला ३ कोटी ५८ लाख ४१ हजार ९१५ रुपयांचा लाभ होऊ शकतो.
  • अशाप्रकारे, स्टेप-अप फॉर्म्युलाच्या मदतीनं तुमच्याकडे ४ कोटी १७ लाख रुपयांचा मोठा निधी जमा होऊ शकतो.


(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Invest 100 rupees daily you can make a fund of 4 crores Life will become tension free mutual fund sip investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.