lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > सोन्याला झळाळी; दिवाळीपासून 4 हजार रुपयांनी भाव वाढले, लगनसराईत आणखी वाढणार

सोन्याला झळाळी; दिवाळीपासून 4 हजार रुपयांनी भाव वाढले, लगनसराईत आणखी वाढणार

चांदीचा दरही 78 हजारांच्या पुढे गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 03:14 PM2023-12-04T15:14:42+5:302023-12-04T15:15:09+5:30

चांदीचा दरही 78 हजारांच्या पुढे गेला आहे.

Gold price has increased by Rs 4 thousand since Diwali, prices will increase further | सोन्याला झळाळी; दिवाळीपासून 4 हजार रुपयांनी भाव वाढले, लगनसराईत आणखी वाढणार

सोन्याला झळाळी; दिवाळीपासून 4 हजार रुपयांनी भाव वाढले, लगनसराईत आणखी वाढणार

Gold rate: न्यूयॉर्कपासून नवी दिल्लीपर्यंत, सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेच. कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीने $2100 ची पातळी ओलांडली होती. त्यामुळे देशातील बाजारात सोन्याच्या किमतीने 64 हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. तर चांदीचे दर 78 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, यंदा सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वर्षअखेरीस सोन्याचा भाव 65 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचू शकतो. 

सोन्याचा भाव वाढला
देशातील फ्युचर्स मार्केट मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव 64 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. MCX वर दुपारी 1:07 वाजता सोन्याचा भाव 288 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह 63645 रुपयांवर व्यवहार करत आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान तो 64,063 रुपयांवर पोहोचला होता. तसेच, सोन्याचा भाव 63,720 रुपयांवर उघडला आहे. मात्र, शुक्रवारी सोन्याचा भाव 63,357 रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे
दुसरीकडे, सकाळी चांदीच्या दरात वाढ झाली आणि 78,549 रुपयांची पातळी गाठली. सध्या सोन्याचा भाव 77,825 रुपयांवर आहे. मात्र, आज चांदीचा भाव 78,150 रुपये प्रति किलोवर उघडला. तज्ज्ञांच्या मते, डिसेंबरअखेर चांदीचा भाव 80 हजार रुपयांची पातळी ओलांडू शकतो.

परदेशी बाजारात सोने आणि चांदी
परदेशी बाजारात सोन्या-चांदीच्या दराने विक्रमी पातळी गाठली होती. कॉमेक्स फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति ऑन $ 2,093.50 वर व्यापार करत आहे, ज्याने $ 2,146 प्रति ऑनची विक्रमी पातळी गाठली होती. सोन्याच्या स्पॉटची किंमत प्रति औंस $ 2,073.94 वर व्यापार करत आहे. तर चांदीचा भाव 0.82 टक्क्यांच्या घसरणीसह $25.65 प्रति ऑनवर व्यवहार करत आहे. चांदीचा स्पॉट सुमारे एक टक्क्यांच्या घसरणीसह $ 25.25 प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

किंमत 64,800 रुपयांपर्यंत पोहोचेल
येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे करन्सी कमोडिटी हेड अनुज गुप्ता यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत 64800 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. फेडने मार्च महिन्यात व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे डॉलर निर्देशांकावर दबाव निर्माण झाला आणि सोन्या-चांदीला आधार मिळाला.

Web Title: Gold price has increased by Rs 4 thousand since Diwali, prices will increase further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.