lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > गौतम अदानी यांनी या सिमेंट कंपनीत केली ₹8339 कोटींची गुंतवणूक; हिस्सेदारी वाढली...

गौतम अदानी यांनी या सिमेंट कंपनीत केली ₹8339 कोटींची गुंतवणूक; हिस्सेदारी वाढली...

या नव्या गुंतवणुकीसह अदानी कुटुंबाची या कंपनीतीली हिस्सेदारी 63.2 टक्केवरुन 70.3 टक्के झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 08:17 PM2024-04-17T20:17:17+5:302024-04-17T20:17:50+5:30

या नव्या गुंतवणुकीसह अदानी कुटुंबाची या कंपनीतीली हिस्सेदारी 63.2 टक्केवरुन 70.3 टक्के झाली आहे.

Gautam Adani invested ₹8339 crore in this cement company; stake increased... | गौतम अदानी यांनी या सिमेंट कंपनीत केली ₹8339 कोटींची गुंतवणूक; हिस्सेदारी वाढली...

गौतम अदानी यांनी या सिमेंट कंपनीत केली ₹8339 कोटींची गुंतवणूक; हिस्सेदारी वाढली...

Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी भारतातील सिमेंट क्षेत्रात मोठा विस्तार करत आहेत. याच दिशेने त्यांनी अंबुजा सिमेंटमध्ये 8,339 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीह कंपनीतील अदानींचा हिस्सा 70.3 टक्के झाला आहे. या पाऊलामुळे सिमेंट कंपनीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे. अदानी यांनी यापूर्वी 18 ऑक्टोबर 2022 रोजी 5000 कोटी रुपये आणि 28 मार्च 2024 रोजी 6661 कोटी रुपये गुंतवले होते. म्हणजेच आता त्यांनी तिसऱ्यांदा गुंतवणूक काली आहे. 

स्टेक किती वाढला?
अदानी समूहाने 2022 मध्ये स्विस कंपनी Holcim कडून अंबुजा आणि ACC खरेदी करण्यासाठी $10.5 बिलियन करार करून सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला होता.या नव्या गुंतवणुकीमुळे अंबुजा सिमेंटमधील अदानी कुटुंबाचा एकूण हिस्सा 63.2 टक्क्यांवरुन 70.3 टक्के झाला आहे. 

कंपनीने काय म्हटले?
अंबुजा सिमेंट्सने एका निवेदनात म्हटले की, अदानी कुटुंबाने कंपनीमध्ये 8,339 कोटी रुपयांची गुंतवणूक करून वॉरंट प्रोग्रामची पूर्ण सदस्यता प्राप्त केली आहे. एकूण गुंतवणूक 20,000 कोटी रुपये आहे. ही गुंतवणूक अंबुजाला मजबूत आणि जलद वाढीसाठी भांडवल प्रदान करते. बार्कलेज बँक पीएलसी, एमयूएफजी बँक, मिझुहो बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने या व्यवहारासाठी सल्लागार म्हणून काम केले आहे.

Web Title: Gautam Adani invested ₹8339 crore in this cement company; stake increased...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.