lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महाराष्ट्रातील अजून दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची दंडात्मक कारवाई

महाराष्ट्रातील अजून दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची दंडात्मक कारवाई

देशातील सर्वोच्च बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता राज्यातील अजून दोन सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 09:17 PM2019-10-29T21:17:34+5:302019-10-29T21:18:23+5:30

देशातील सर्वोच्च बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता राज्यातील अजून दोन सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली आहे.

Reserve Bank of India penalties on two cooperative banks in Maharashtra | महाराष्ट्रातील अजून दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची दंडात्मक कारवाई

महाराष्ट्रातील अजून दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची दंडात्मक कारवाई

मुंबई - आर्थिक अनियमिततेमुळे पंजाब-महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे हजारो ठेवीदार अडचणीत आलेले आहेत. या कारवाईला काही दिवस उलटत नाहीत तोच  देशातील सर्वोच्च बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता राज्यातील अजून दोन सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली आहे.  नियमांचा भंग केल्याने रिझर्व्ह बँकेने पुण्यातील जनता सहकारी बँक आणि जळगावमधील जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.  

रिझर्व्ह बँकेने नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत पुण्यातील जनता सहकारी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जनता सहकारी बँकेने मिळकत ओळख आणि मालमत्ता वर्गीकरण (आयआरएसी) निकष, प्रगती आणि एक्सपोजर मानदंड आणि वैधानिक / इतर निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे. 



त्याशिवाय जळगावमधील जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.  

Web Title: Reserve Bank of India penalties on two cooperative banks in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.