lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेखा झुनझुनवालांची मोठी गुंतवणूक, 'या' नव्या कंपनीचे खरेदी केले ५ लाख शेअर्स; जाणून घ्या

रेखा झुनझुनवालांची मोठी गुंतवणूक, 'या' नव्या कंपनीचे खरेदी केले ५ लाख शेअर्स; जाणून घ्या

दिग्गज गुंतवणूकदार रेखा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एका नवीन स्टॉकची एन्ट्री झालीये.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:21 PM2024-04-17T16:21:01+5:302024-04-17T16:21:39+5:30

दिग्गज गुंतवणूकदार रेखा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एका नवीन स्टॉकची एन्ट्री झालीये.

Rekha Jhunjhunwala s big investment bought 5 lakh shares of km sugar mills limited investment | रेखा झुनझुनवालांची मोठी गुंतवणूक, 'या' नव्या कंपनीचे खरेदी केले ५ लाख शेअर्स; जाणून घ्या

रेखा झुनझुनवालांची मोठी गुंतवणूक, 'या' नव्या कंपनीचे खरेदी केले ५ लाख शेअर्स; जाणून घ्या

दिग्गज गुंतवणूकदार रेखा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एका नवीन स्टॉकची एन्ट्री झालीये. रेखा झुनझुनवाला यांनी केएम शुगर मिल्स लिमिटेडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी मार्च 2024 च्या तिमाहीत केएम शुगर मिल्सचे सुमारे 5 लाख शेअर्स खरेदी केलेत. कंपनीत त्यांचा हिस्सा 0.54 टक्के आहे. केएम शुगर मिल्स लिमिटेडचा शेअर मंगळवारी, 16 एप्रिल रोजी 30.03 रुपयांवर बंद झाला. केएम शुगर मिल्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 39.20 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 24.25 रुपये आहे.
 

या कंपन्यांतील हिस्सा केला कमी
 

ब्लूमबर्गच्या डेटानुसार, डिसेंबर 2023 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 26 कंपन्यांचे शेअर्स होते आणि त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.9 बिलियन डॉलर्स होते. या 26 कंपन्यांपैकी 13 कंपन्यांनी मार्च 2024 तिमाहीसाठी त्यांच्या शेअरहोल्डिंग डेटाचा खुलासा केलाय. यापैकी क्रिसिल, टाटा कम्युनिकेशन्स, फोर्टिस हेल्थकेअर, राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स, एनसीसी आणि कॅनरा बँक यामधील हिस्सा कमी झालाय. तर 6 कंपन्यांमधील रेखा झुनझुनवाला यांच्या स्टेकमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
 

टाटाचे 7 लाखांपेक्षा अधिक शेअर विकले
 

त्यांनी मार्च 2024 तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचे ​​7.34 लाख शेअर्स विकले. कंपनीमध्ये आता त्यांचा हिस्सा कमी होऊन 1.58 टक्के झालाय, जो आधी 1.84 टक्के होता. झुनझुनवाला यांनी मार्च 2024 च्या तिमाहीत CRISIL चे 20000 शेअर्स देखील विकले आहेत. आता झुनझुनवाला यांचा CRISIL मधील स्टेक 5.47% वरून 5.44% झालाय. याशिवाय रेखा झुनझुनवाला यांनी फोर्टिस हेल्थकेअरचे 44.28 लाख शेअर्स विकले आहेत. कंपनीत आता त्यांचा हिस्सा 4.66 टक्क्यांवरून 4.07 टक्क्यांवर आलाय. याशिवाय त्यांनी राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्सचे 12000 शेअर्सही विकले आहेत. आता कंपनीतील झुनझुनवाला यांचा हिस्सा 5.06 टक्क्यांवर आला आहे. रेखा झुनझुनवाला यांनी एनसीसीचे 38.07 लाख शेअर्सही विकले आहेत.
 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Rekha Jhunjhunwala s big investment bought 5 lakh shares of km sugar mills limited investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.