lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेलच्या दरांत विक्रमी उसळी, पुन्हा शंभरी पार

पेट्रोल-डिझेलच्या दरांत विक्रमी उसळी, पुन्हा शंभरी पार

राजस्थान आणि मध्यप्रदेशात पेट्रोलचा दर शुक्रवारीच प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा अधिक झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:20 AM2021-05-09T03:20:49+5:302021-05-09T03:21:48+5:30

राजस्थान आणि मध्यप्रदेशात पेट्रोलचा दर शुक्रवारीच प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा अधिक झाला.

Record jump in petrol-diesel prices, over a hundred again | पेट्रोल-डिझेलच्या दरांत विक्रमी उसळी, पुन्हा शंभरी पार

पेट्रोल-डिझेलच्या दरांत विक्रमी उसळी, पुन्हा शंभरी पार

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा विक्रमी उसळी घेतली असून, पेट्रोलने या वर्षात दुसऱ्यांदा शंभरी पार केली आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशात पेट्रोलचा दर शुक्रवारीच प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा अधिक झाला. याआधी १७ फेब्रुवारी रोजी राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले होते. मागील चार दिवसांत पेट्रोल ८८ पैशांनी तर डिझेल एक रुपयाने महागले. (Record jump in petrol-diesel prices, over a hundred again)

शुक्रवारी श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल पुन्हा १०२.१५ रुपये लिटर झाले. तसेच मध्यप्रदेशातील अनुप्पूर येथे पेट्रोल १०१.८६ रुपये लिटर झाले. शनिवारी दरवाढ झालेली नसल्यामुळे हेच दर कायम राहिले. महाराष्ट्रातील परभणी येथेही पेट्रोलचा दर १०० रुपये लिटर राहिला. चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांच्या काळात पेट्रोल-डिझेलची दरवाढ सरकारने रोखून धरली होती. 

करात वाढ केली
कोरोना साथीचा फटका बसल्याने गेल्या वर्षी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी घसरण झाली होती. त्याचा लाभ ग्राहकांना देण्याऐवजी केंद्र सरकारने करात मोठी वाढ केली होती. १६ मार्च आणि ५ मे अशा दोन टप्प्यांत पेट्रोलवर १३ रुपयांची, तर डिझेलवर १६ रुपयांची करवाढ केंद्राने लादली होती.
 

Web Title: Record jump in petrol-diesel prices, over a hundred again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.