lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI चा मोठा निर्णय! आता 'या' बँकेच्या ग्राहकांना खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये

RBI चा मोठा निर्णय! आता 'या' बँकेच्या ग्राहकांना खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये

Reserve Bank of India : ग्राहकांना बचत खात्यातून एक हजाराहून अधिक रक्कम काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 08:26 AM2021-02-20T08:26:36+5:302021-02-20T08:35:19+5:30

Reserve Bank of India : ग्राहकांना बचत खात्यातून एक हजाराहून अधिक रक्कम काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

rbi puts rs 1000 withdrawal cap on deccan urban co op bank know details | RBI चा मोठा निर्णय! आता 'या' बँकेच्या ग्राहकांना खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये

RBI चा मोठा निर्णय! आता 'या' बँकेच्या ग्राहकांना खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकच्या डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत (Deccan Urban Co-op Bank) एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने डेक्कन अर्बन बँकेला नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवी स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. तसेच ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातून एक हजाराहून अधिक रक्कम काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सहकारी बँकेला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय नवीन गुंतवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. 

आरबीआयने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना यासंबंधी सूचना दिल्या असल्याचं म्हटलं आहे. यासंबंधी केंद्रीय बँकेने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, "बँकेची सध्याची स्थिती लक्षात घेता ठेवीदारांना सर्व बचत खाती किंवा चालू खात्यांमधून एक हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी मिळणार नाही." तसेच बँकेने ग्राहकांना कर्जाबाबत देखील माहिती दिली असून त्यासाठी काही अटी असल्याचं म्हटलं आहे. नियामकाने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण 99.58 टक्के ठेवीदार ठेवी विमा आणि कर्ज हमी कॉर्पोरेशन विमा कॉर्पोरेशन (डीसीजीसी) योजनेंतर्गत आहेत. 

डीसीजीसी ही आरबीआयची एक सपोर्टिव्ह कंपनी आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, बँकेवरील बंदीचा अर्थ बँक परवाना रद्द केला असा नाही. आता जारी केलेल्या निर्देशानुसार, आर्थिक परिस्थिती बँकेची सुधारण्यासाठी बँक मदत होईल आणि व्यवहार सुरू राहतील. 19 फेब्रुवारी 2021 ला हा नियम जारी करण्यात आला असून सहा महिने लागू राहणार आहे. देशामध्ये शेती आणि ग्रामीण भागात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत सहकारी बँका स्थापन केल्या आहेत. गेल्या वर्षी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर सर्व सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

फाटलेल्या नोटेचा अर्धाच तुकडा असला तरी आता नो टेन्शन, पैसे मिळणारच; जाणून घ्या काय आहे नियम?

कधी कधी पैशांची देवाण-घेवाण करताना चुकून एखादी नोट फाटली जाते. नोट चुकून फाटली की पैसे फुकट गेले असा अनेकांचा समज होतो. मात्र जुन्या किंवा फाटलेल्या नोटा या रिझर्व्ह बँकेकडून बदलून घेता येतात. कधी कधी फाटलेल्या नोटेचा अर्धा भागच शिल्लक राहतो पण असं असलं तरी तुम्ही रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळवू शकता. तुमच्याकडे नोटेचा जितका भाग असेल त्याप्रमाणात रिझर्व्ह बँक पैसे परत देते.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, अर्धवट फाटलेल्या नोटेचेही मूल्य असते. आता प्रत्येक नोटेसाठी हा नियम वेगवेगळा आहे. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 ते 20 रुपये मूल्यांची नोट अर्धवट फाटली असेल तर त्याचे अर्धे मूल्य मिळू शकत नाही. अशा स्थितीत या नोटांचे पूर्ण मूल्य दिले जाते. पण 50 रुपये ते 2000 रुपयांच्या नोटा फाटल्या असतील तर तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळू शकते.

 

Web Title: rbi puts rs 1000 withdrawal cap on deccan urban co op bank know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.