lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग आठव्यांदा RBI कडून Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही, व्याज दर 'जेसे थे'

सलग आठव्यांदा RBI कडून Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही, व्याज दर 'जेसे थे'

RBI monetary policy : रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढावा समितीची बैठक पडली पार. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 10:28 AM2021-10-08T10:28:16+5:302021-10-08T10:29:32+5:30

RBI monetary policy : रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढावा समितीची बैठक पडली पार. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय

RBI Monetary Policy LIVE Updates Key Rates Steady GDP Growth Retained At 9 5 percent | सलग आठव्यांदा RBI कडून Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही, व्याज दर 'जेसे थे'

सलग आठव्यांदा RBI कडून Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही, व्याज दर 'जेसे थे'

Highlightsरिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढावा समितीची बैठक पडली पार. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय

रिझर्व्ह बँकेच्या (Resrve Bank Of india) द्विमासिक पतधोरण आढावा समितीच्या तीन दिवसीय बैठकीची सांगता झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवण्यावर निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान दास यांनी सलग आठव्यांदा व्याज दरात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याची माहिती दिली.

रिझर्व्ह बँकेनं सलग आठव्यांदा व्याज दरात कोणतेही बदल केलेले नाही. रेपो दर ४ टक्क्यांवर आणि रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे सामान्यांच्या ईएमआय (EMI) मध्ये तुर्तास कोणताही बदल होणार नाही.



"रिझर्व्ह बँक वाढीसाठी शाश्वत आधारावर पुनरुज्जीवनासाठी मवाळ भूमिका कायम ठेवेल. कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासूनच रिझर्व्ह बँकेनं १०० पेक्षा अधिक उपाययोजना केल्या. महागाईची स्थिती अपेक्षेपेक्षा अनुकुल आहे. तसंच आर्थिक क्रियाही हळूहळू वाढत मार्गांवर येत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२१-२२ साठी ९.५ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज कायम ठेवला आहे," असं दास यांनी स्पष्ट केलं.

Web Title: RBI Monetary Policy LIVE Updates Key Rates Steady GDP Growth Retained At 9 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.