lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 10:27 AM2020-05-22T10:27:53+5:302020-05-22T10:58:10+5:30

लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

RBI give relief on EMI & cuts repo rates BKP | खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

मुंबई - कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्जाचे हप्ते न भरण्याची मुभा अजून तीन महिन्यांनी वाढवली आहे. तसेच रेपो दरांमध्ये रिझर्व्ह बँकेने  मोठी कपात केली आहे.

यापूर्वी मार्च महिन्यात  रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना दिलासा देताना तीन महिने ईएमआय भरण्यापासून सवलत दिली होती. त्यानंतर आता आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सध्याची परिस्थिती विचारात घेऊन कर्जदारांना कर्जाचे हप्ते अजून तीन महिने  न भरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता कर्जदारांना जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने कर्जाचे हप्ते न भरण्याची सवलत मिळणार आहे. 


 

शक्तिकांत दास यांनी सांगितले की, रेपो रेटमध्ये ४० बेसीस पॉईंटने कपात करून तो ४.४ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांवर राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी केलेल्या या घोषणेमुळे पुढच्या काही दिवसांमध्ये कर्जावरील व्याजदरांमध्ये मोठी कपात होण्याची शक्यता आहे. 

Web Title: RBI give relief on EMI & cuts repo rates BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.