lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office Saving Schemes News: पोस्टाची सुपरहिट स्कीम! नेहमीपेक्षा वेगळ्या योजना, चांगला फायदा देतात

Post Office Saving Schemes News: पोस्टाची सुपरहिट स्कीम! नेहमीपेक्षा वेगळ्या योजना, चांगला फायदा देतात

Post Office Saving Schemes News: पोस्टात बचत करण्याचे अनेक फायदे आहेत. यापैकी एक महत्वाचा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि बँकांपेक्षा जा्स्त परतावा मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 05:56 PM2021-12-05T17:56:57+5:302021-12-05T17:57:18+5:30

Post Office Saving Schemes News: पोस्टात बचत करण्याचे अनेक फायदे आहेत. यापैकी एक महत्वाचा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि बँकांपेक्षा जा्स्त परतावा मिळतो.

Post Office Saving Schemes News: Different plans than usual, offer better benefits, interest rates | Post Office Saving Schemes News: पोस्टाची सुपरहिट स्कीम! नेहमीपेक्षा वेगळ्या योजना, चांगला फायदा देतात

Post Office Saving Schemes News: पोस्टाची सुपरहिट स्कीम! नेहमीपेक्षा वेगळ्या योजना, चांगला फायदा देतात

भविष्याची तरतूद करण्यासाठी रोजच्या कमाईतून पै-पै जोडावा लागतो. सामान्य माणूस शेअर बाजारात, म्युच्युअल फंडामध्ये पैसे लावताना घाबरतो. जोखिम खूप आहे, यामुळे ते घाबरतात. यामध्ये तुम्ही आम्ही पण आहोत. बँकांमध्ये व्याजदर कमी असतात त्यामुळे सामान्यांसमोर पर्याय उरतो तो पोस्ट ऑफिस. 

पोस्टात बचत करण्याचे अनेक फायदे आहेत. यापैकी एक महत्वाचा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि बँकांपेक्षा जा्स्त परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस (post office) च्या काही अशा योजना असतात की पाच वर्षात लॉक इनसोबत गुंतवणूक करू शकतात. इथे आपल्याला गॅरंटीड रिटर्न मिळतो. आणखी एक फायदा असा की, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून करात सूट देखील मिळणार आहे. 

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (POTD)

पोस्ट ऑफिसमध्ये एफडी - मुदत ठेव - पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते (टीडी) सारखी योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. जर तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर तुम्हाला 5 वर्षांसाठी टाईम डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवावे लागतील. या योजनेत वार्षिक ६.७ टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेअंतर्गत, तुम्ही किमान 1000 रुपयांचे खाते उघडू शकता. 100 च्या पटीत तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता. तुम्हाला ५ वर्षांच्या टाइम डिपॉझिट स्कीमवर आयकर सवलतीचा लाभही मिळतो.


पोस्ट ऑफिस आरडी खाते (Post Office RD Account)
पाच वर्षांच्या गुंतवणुकीसाठी, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD वर सध्या वार्षिक 5.8 टक्के व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये, तुम्ही किमान रु. 100 चे खाते उघडू शकता. कमाल ठेव रकमेवर मर्यादा नाही. (Post Office Recurring Deposit Account-RD)


पोस्ट ऑफिस एनएससी
पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (पोस्ट ऑफिस NSC) चा लॉक-इन कालावधी किमान पाच वर्षांचा असतो. या योजनेत तुम्ही तुमचे पैसे पाच वर्षानंतरच काढू शकता. NSC मध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. सध्या या योजनेतील व्याज दर वार्षिक ६.८ टक्के आहे. या योजनेत तुम्ही किमान गुंतवणूक करू शकता रु 1,000 आणि कमाल गुंतवणूक मर्यादा नाही.

Web Title: Post Office Saving Schemes News: Different plans than usual, offer better benefits, interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.