lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या 'या' राज्यात तब्बल 12 रुपयांनी स्वस्त मिळतंय पेट्रोल; असं आहे कारण

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या 'या' राज्यात तब्बल 12 रुपयांनी स्वस्त मिळतंय पेट्रोल; असं आहे कारण

सध्या पेट्रोलची बेस प्राइस 19.48 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.98 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. डिझेलची बेस प्राइस 28.66 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.83 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. (Petrol-Diesel prices )

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 19, 2021 09:03 PM2021-02-19T21:03:52+5:302021-02-19T21:10:50+5:30

सध्या पेट्रोलची बेस प्राइस 19.48 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.98 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. डिझेलची बेस प्राइस 28.66 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.83 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. (Petrol-Diesel prices )

Petrol prices less by almost 12 rupees per litre in chhattisgarh as state govt imposes less vat | महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या 'या' राज्यात तब्बल 12 रुपयांनी स्वस्त मिळतंय पेट्रोल; असं आहे कारण

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या 'या' राज्यात तब्बल 12 रुपयांनी स्वस्त मिळतंय पेट्रोल; असं आहे कारण

Highlightsसध्या पेट्रोलची बेस प्राइस 19.48 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.98 रुपये एक्साइज ड्यूटी घेते.डिझेलची बेस प्राइस 28.66 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.83 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये शुक्रवारी पेट्रोलचा दर 87.28 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 85.66 रुपये प्रति लिटर एवढा होता.

रायपूर - पेट्रोल-डिझेल दर वाढीने संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. मात्र, असे असतानाच शेजारील काँग्रेसचे (Congress) सरकार असलेल्या छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) पेट्रोल प्रति लिटर 12 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.  एवढेच नाही, तर येथे डिझेलचे (Diesel) दरही इतर राज्यांच्या तुलनेत 4 रुपये प्रति लिटरने कमी आहेत. याच मुद्द्यावरून ऑल इंडिया महिला काँग्रेसने ट्विट करत भाजप शासित राज्यांवर निशाणा साधला आहे. केवळ काँग्रेसलाच सामान्य जनतेला  होणाऱ्या त्रासाची परवा आहे, असे या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे. (Petrol prices less by almost 12 rupees per litre in Chhattisgarh as state govt imposes less vat)

इतर राज्यांच्या तुलनेत छत्तीसगडमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट कमी लागतो. हेच येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी असण्याचे कारण आहे. येथे पेट्रोलवर 25 टक्के म्हणजे, 2 रुपये प्रति लिटर व्हॅट लागतो. तर डिझेलवरही 25 टक्के म्हणजे, 1 रुपया प्रति लिटर व्हॅट लागतो.

आता सरकारी अधिकारी अन् मंत्र्यांसाठी अनिवार्य होणार इलेक्ट्रिक वाहन! केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले...

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये शुक्रवारी पेट्रोलचा दर 87.28 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 85.66 रुपये प्रति लिटर एवढा होता. महाराष्ट्राशी तुलना करता महाराष्ट्रातील गोंदियात पेट्रोलचा दर 96.07 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 86.31 रुपये प्रति लिटर एवढा आहे. 

मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये पेट्रोल 99.07 रुपये, तर डिझेल 89.55 रुपये प्रति लिटर आहे. झारखंडमध्येही सिमडेगा येथे पेट्रोलचा दर 87.81 रुपये, तर डिझेल 85.19 रुपये प्रति लिटर आहे. ओडिशातील बारगड येथे पेट्रोल 90.64 रुपये, तर डिझेल 87.34 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेल शंभरी पार; बाबा रामदेव म्हणतात, "...तर सायकलचा ट्रेंड सुरू करा!"

सध्या पेट्रोलची बेस प्राइस 19.48 रुपये प्रति लिटर -
सध्या पेट्रोलची बेस प्राइस 19.48 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.98 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. तर छत्तीसगडमध्ये यावर 15.11 रुपये प्रति लिटर व्हॅट लावला जातो. डिझेलची बेस प्राइस 28.66 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.83 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. तर छत्तीसगड सरकारने यावर 16.12 रुपये प्रति लिटर व्हॅट लावला आहे.

 

Web Title: Petrol prices less by almost 12 rupees per litre in chhattisgarh as state govt imposes less vat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.