lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्टात अवघ्या 20 रुपयांत उघडा खातं, बँकेसारख्या व्याजासह मिळणार 'या' सुविधा मोफत

पोस्टात अवघ्या 20 रुपयांत उघडा खातं, बँकेसारख्या व्याजासह मिळणार 'या' सुविधा मोफत

पोस्टात अशा अनेक योजना आहेत, ज्या सामान्यांच्या फायद्याच्या असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 09:27 AM2019-07-31T09:27:18+5:302019-07-31T09:27:42+5:30

पोस्टात अशा अनेक योजना आहेत, ज्या सामान्यांच्या फायद्याच्या असतात.

open post office saving account with just 20 rupees know about interest rate minimum balance cheque and other facility | पोस्टात अवघ्या 20 रुपयांत उघडा खातं, बँकेसारख्या व्याजासह मिळणार 'या' सुविधा मोफत

पोस्टात अवघ्या 20 रुपयांत उघडा खातं, बँकेसारख्या व्याजासह मिळणार 'या' सुविधा मोफत

नवी दिल्लीः पोस्टात अशा अनेक योजना आहेत, ज्या सामान्यांच्या फायद्याच्या असतात. पोस्टात आपल्याला एखाद्या बँकेसारखीच सुविधा उपलब्ध होते. विशेष म्हणजे पोस्टात फक्त 20 रुपयांमध्ये खातं उघडता येते. पोस्टाच्या सेव्हिंग खात्यात फक्त कमीत कमी 50 रुपये ठेवणं गरजेचं असतं. पोस्टात आपल्याला आता ATM आणि चेकबुकची सुविधाही मिळते.

 या अकाऊंटवर 4 टक्के व्याज दिले जाते. चेक नको असलेलं सेव्हिंग अकाऊंट फक्त 20 रुपयांमध्ये उघडता येणार नाही. त्यात कमीत कमी 50 रुपये ठेवावे लागणार आहेत. तर चेकची सुविधा असलेलं खातं उघडण्यासाठी 500 रुपये भरावे लागणार आहेत. तसेच त्यात कमीत कमी 500 रुपये बॅलन्स ठेवावं लागणार आहे. बचत खात्यातील 10 हजारांपर्यंतच्या रकमेवर कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही. दोन ते तीन जण मिळून संयुक्त खातंही उघडू शकतात. बचत खात्य कार्यान्वित राहण्यासाठी तीन वर्षांतून एकदा तरी व्यवहार होणार आवश्यक असतं.  

  • जाणून घ्या या खात्याची खासियत

तर दुसऱ्या प्रकारातलं सेव्हिंग अकाऊंट हे 500 रुपये जमा करून उघडता येणार आहे. या खात्यामध्ये चेकबुकसह एटीएमची सुविधा मिळणार आहे. या खात्यामध्ये कमीत कमी 500 रुपये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनेतून मिळणारं 10 हजार रुपयांपर्यंतचं व्याज हे पूर्णतः टॅक्स फ्री असतं. तसेच हे खातं कोणत्याही पोस्ट ऑफिस वळतं करता येते. 

  • असं उघडू शकतो सेव्हिंग खातं

पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म पोस्ट ऑफिसशिवाय इतर साइटवरून डाऊनलोड करता येतो. सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठी KYC पूर्ण करावं लागतं. 

  • खातं उघडण्यासाठी लागतात हे दस्तावेज

पोस्टात खातं उघडण्यासाठी आयडी प्रूफमध्ये मतदाराचं कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ऍड्रेस प्रूफमध्ये बँकेचं पासबुक, पासपोर्ट, रेशन कार्ड, विजेचं बिल, फोनचं बिल, आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तसेच पासपोर्ट साइज फोटो आणि संयुक्त खात्यात इतर खातेधारकांचे फोटो असणं गरजेचं आहे. 
 

Web Title: open post office saving account with just 20 rupees know about interest rate minimum balance cheque and other facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.