One out of five Indian UHNWIs plan to buy new home in 2021 Knight Frank Wealth Report | २०२१ मध्ये घरांच्या किंमती वाढणार! ... म्हणून २० टक्के श्रीमंत भारतीयांनी आखली नव्या घर खरेदीची योजना

२०२१ मध्ये घरांच्या किंमती वाढणार! ... म्हणून २० टक्के श्रीमंत भारतीयांनी आखली नव्या घर खरेदीची योजना

ठळक मुद्देघरांची किंमती मोठ्या प्रमाणात वाढणार, अहवालातून व्यक्त करण्यात आली शक्यतानाईट फ्रँक वेलनं सादर केला नवा अहवाल

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर रिअल एस्सेट क्षेत्राला मोठा फटका बसला होता. परंतु सध्या शिथिल होत असलेलं लॉकडाऊन आणि अन्य बाबींमुळे यात आता बदल होत आहे. एका रिपोर्टनुसार देशातील जवळपास २० टक्के अल्टा हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्स (UHNWI) २०२१ या वर्षात नव्या घर खरेदीची योजना आखत आहेत. गेल्या वर्षी या लोकांची संख्या केवळ १० टक्के होती. याव्यतिरिक्त अल्ट्रा रिच भारतीयांच्या गुंतवणूकीचं आवडतं प्रमुख ठिकाण हे भारतच असून त्यानंतर अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीला ते प्राधान्य देत असल्याचंही समोर आलं आहे. नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट २०२१ नुसार जागतिक स्तरावर प्रमुख देशांच्या या मागणीमुळे घरांच्या किंमतीत ७ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त नाईट फ्रॅन्कच्या सर्वेक्षणानुसार ४१ टक्के अल्ट्रा रिच भारतीय रिसॉर्ट्स किंवा किनारी भागात नवी घरं खरेदी करू शकत असल्याचं म्हटलं आहे. अल्टा हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्सचा (UHNWI) अर्थ असा की ज्यांच्याकडे कमीतकमी ३ कोटी डॉलर्सची संपत्ती आहे.

नाईट फ्रँकद्वारे करण्यात आलेल्या द अॅटिट्युड सर्वेक्षणानुसार भारतात UHNWI च्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, जे २०२१ मध्ये आपलं नवं घर खरेदी करू इच्छित आहेत. यासाठी प्रमुख तीन कारणं असल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे. आपलं घर अपग्रेड करणं, एखादं नवं हॉलिडे होम खरेदी करणं आणि स्थायी रूपयानं अन्य देशात किंवा भारतातच वेगळ्या ठिकाणी शिफ्ट होणं अशी ही कारणं आहेत.

या सुविधांची गरज 

नव्या घरांची निवडत करताना भारतीय UHNWI च्या साठी ट्रान्सपोर्ट लिंक्स, इंटरनेट कनेक्टिव्हीटीसारख्या सुविधा जास्त महत्त्वाच्या आहेत. जास्तीत जास्त भारतीय UHNWI भारतात गुंतवणूकीसाठी ऑफिस आणि लॉजिस्टिक्स टॉपच्या दोन रिअल एस्टेट सेक्टरच्या रुपात वर आल्याचं सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. भारतीय UHNWI आपल्या संपत्तीच्या १७ टक्के कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूकीसाठी ठेवतात. जागतिक स्तरावर ही संख्या २१ टक्के इतकी आहे.

रिअल एस्टेटसाठी उत्तम वर्ष

नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालय शिशिर बैजल यांच्या मते भारतीय बाजारपेठेत २०२१ हे वर्ष रिअल एस्टेटसाठी आशादायक आहे. सरकारी सुधारणांमुळे रहिवासी बाजाराच्या २०२० च्या अखेरच्या दोन तिमाहींत रिकव्हरीला सुरूवात झाली होती. यावर्षी पर्यावरण, सामाजिक आणि ईएसजी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक वाढू शकते. UHNWI ईएसजी केंद्रीत प्रॉपर्टीमद्ये गुंतवणूक करण्यास रस दाखवतात. नाईट फ्रँकमधील रिसर्च विभागाचे जागतिक प्रमुख लिएम बेली यांच्यानुसार जगातील २६ टक्के UHNWIs २०२१ मध्ये आपल्या नवी घराच्या शोधात आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: One out of five Indian UHNWIs plan to buy new home in 2021 Knight Frank Wealth Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.