lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भाषण देताना NSDL प्रमुखांचा घसा सुकला; पाण्याचा ग्लास घेऊन अर्थमंत्री जाताच सारे शॉक झाले

भाषण देताना NSDL प्रमुखांचा घसा सुकला; पाण्याचा ग्लास घेऊन अर्थमंत्री जाताच सारे शॉक झाले

भाषणादरम्यान, एनएसडीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंदुरू यांचा घसा सुकला. अर्थमंत्र्यांचं अनेकांकडून होतंय कौतुक. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 09:47 AM2022-05-09T09:47:01+5:302022-05-09T09:50:31+5:30

भाषणादरम्यान, एनएसडीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंदुरू यांचा घसा सुकला. अर्थमंत्र्यांचं अनेकांकडून होतंय कौतुक. 

viral video seeing this humility of finance minister nirmala sitharaman twitter users are praising getting up from their seats and offered water to nsdl md | भाषण देताना NSDL प्रमुखांचा घसा सुकला; पाण्याचा ग्लास घेऊन अर्थमंत्री जाताच सारे शॉक झाले

भाषण देताना NSDL प्रमुखांचा घसा सुकला; पाण्याचा ग्लास घेऊन अर्थमंत्री जाताच सारे शॉक झाले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या व्यवस्थापकीय संचालकांना पाणी देताना दिसत आहेत. खरं तर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंदुरू या कार्यक्रमादरम्यान भाषण देत होत्या. या कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या.

भाषणादरम्यान, चंदुरू यांनी कर्मचाऱ्याकडे पाणी मागितलं. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी पाणी दिले. व्हिडीओमध्ये अर्थमंत्री आपल्या आसनावरून उठून कार्यक्रमाला संबोधित करणाऱ्या पद्मजा चंदुरू यांना पाण्याचा ग्लास देताना दिसत आहेत. निर्मला सीतारामन यांनी त्या ठिकाणी उपस्थित लोकांची मने जिंकली आणि लोकांनी त्यांचं कौतुकही केलं. त्याचवेळी, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत.


हा व्हिडीओ एनएसडीएलच्या सिल्व्हर ज्युबिली कार्यक्रमाचा आहे. मुंबईत शनिवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हिंदी आणि अन्य स्थानिक भाषांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एनएसडीएलचा गुंतवणूक कार्यक्रमाचा सुभारंभ केला.

Web Title: viral video seeing this humility of finance minister nirmala sitharaman twitter users are praising getting up from their seats and offered water to nsdl md

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.